संवेदना प्रकल्पाकडून लातूर जिल्हयाचे स्थानिक स्तर समितीचे कार्य (LLC-National Trust), 18 वर्षांवरील बौद्धिक दृष्टया दिव्यांग व्यक्तींना कायदेशीर पालकत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले
संवेदना प्रकल्पाकडून लातूर जिल्हयाचे स्थानिक स्तर समितीचे कार्य (LLC-National Trust), 18 वर्षांवरील बौद्धिक दृष्टया दिव्यांग व्यक्तींना कायदेशीर पालकत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले
मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली आणि मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर यांच्या कडून कायदेविषयक माहिती व अमंलबजावणी करण्यासाठीचे महाशिबीर दि. 17 नोंव्हेंबर 2019 रोजी सांगवी(सु.) ता. अहमदपुर ये आयोजित केले होते. या शिबिरामध्ये संवेदना प्रकल्पाकडून लातूर जिल्हयाचे स्थानिक स्तर समितीचे कार्य (LLC-National Trust), 18 वर्षांवरील बौद्धिक दृष्टया दिव्यांग व्यक्तींना कायदेशीर पालकत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले. मा. जिल्हाधिकारी श्री जी. श्रीकांत, लातूर यांनी मा. न्यायमुर्ती श्री पी.बी. वरांळे, उच्च न्यायालय, मुंबई यांना या कार्याची माहिती दिली. यावेळी मा. वृषाली जोशी(प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश) आणि मा. श्रीमती एस.डी. कंकनवाडी(सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर) यांची प्रमुख उपस्थिती होती. या महाशिबीरामध्ये लातूर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राकडून 21 प्रकारच्या दिव्यांगाची माहिती असलेली उत्कृष्ट प्रदर्शनी मांडण्यात आली.