संवेदना प्रकल्पात शिक्षक दिन साजरा
शिक्षक दिन निमित्त दि. 04 सप्टेंबर 2025 रोजी संवेदना प्रकल्पामध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या वेळी शालेय समितीचे अध्यक्ष ऍड. श्री श्रीरामजी देशपांडे, कार्यवाह श्री राहुलजी देशपांडे, कान-नाक- घसा तज्ञ श्री भालचंद्रजी पैके, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दीपाताई पाटील, संवेदना ITI समन्वयक श्री विठ्ठल गाडेकर, प्राचार्य श्री आकाश मगर, सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवरांच्या समोर शाळेतील मुलांनी ढोल व लेझीमच्या सहाय्याने सुंदर प्रात्यक्षिकाचे सादरीकरण केले.या वेळी श्री. सिद्धेश्वर लाखदिवे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवना विषयी थोडक्यात माहिती दिली.
या निमित्त मान्यवरांच्या हस्ते सर्व शिक्षकांना पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यक्षीय समारोप श्री श्रीरामजी देशपांडे यांनी केले. त्यांच्या मनोगतात त्यांनी, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे विद्यार्थी असताना सर्वात प्रिय विद्यार्थी होते ते शिक्षक झाल्यावर सर्वात प्रिय शिक्षक होते. ते देशाचे प्रथम उपराष्ट्रपती व नंतर राष्ट्रपती या सर्वोच्च पदापर्यंत त्यांनी पद भूषविले, असे सांगीतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री आदर्श भस्मे यांनी केले. या कार्यक्रमाची सांगता कल्याणमंत्राने करण्यात आली.