दिव्यांगाना सहानुभूति नको आधार हवा प्रा. डॉ. श्री. संजय गवई
दिव्यांगाना सहानुभूति नको आधार हवा प्रा. डॉ. श्री. संजय गवई
दिव्यांगाना सहानुभूति नको आधार हवा प्रा. डॉ. श्री. संजय गवई
दि. 08 ऑगस्ट 2025 रोजी संवेदना दिव्यांगाकरिता बहुउद्देशीय प्रकल्पात महात्मा बस्वेश्वर महाविद्यालय, लातूर येथील BSW प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी निरीक्षण भेटीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महात्मा बस्वेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्री. संजय गवई, विभागप्रमुख प्रा. डॉ. श्री. दिनेश मौने, प्रा. डॉ. श्री. दत्ता करंडे, प्रा. श्री. आशिष स्वामी, प्रा. श्री. प्रकाश राठोड, संवेदना प्रकल्पाचे संपर्क प्रमुख श्री. सुरेश दादा पाटील, मुख्याध्यापिका सौ. दीपा पाटील, यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री सुरेश दादा पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका सौ. दीपा पाटील यांनी दिव्यांगाचे सर्व प्रकारासह, समाजातील उल्लेखनीय कार्य केलेल्या दिव्यांग व्यक्तींचा परिचय सांगितला. विशेष शिक्षक, श्री व्यंकट लामजाने यांनी संवेदना प्रकल्पासह घरोंदा, DDRC, जनकल्याण समितीच्या दिव्यांगा विषयावरील कार्याची माहिती विषद केली. प्रा. श्री संजय गवई यांनी संवेदना करित असलेल्या कार्याबद्दल कौतुक केले. समाजकार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी संवेदना व महात्मा बस्वेश्वर महाविद्यालय यांनी आयोजित उपक्रमास सहभाग होऊन दिव्यांगाना आधार द्यावा. असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री व्यंकट लामजाने यांनी केले. निरीक्षण भेटीस समाजकार्य अभ्यासक्रमाचे 60 विद्यार्थ्यांनसह प्राध्यापक, विशेष शिक्षक यांची प्रमुख उपस्थिती होती.