राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्था सिकंद्राबाद यांच्या वतीने आयोजित 'पर्पल फेअर- 2025’ लातूर येथे संपन्न .* लातूर – दिव्यांग कलाकरांनी आपल्या अफाट कौशल्याने आणि जिद्दीने कलेच्या सर्व सीमा तोडून अविस्मरणीय नृत्य सादर केले. या दमदार सादरीकरणाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. शनिवारी शहरातील रूक्मिणी मंगल कार्यालयात झालेल्या पर्पल फेअर-2025 या दिव्यांगांच्या मेळाव्यात जिल्हयातील दिव्यांगांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार यांच्या समन्वयाने राष्ट्रीय बौध्दिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्था, सिकंदराबाद यांच्या सहकार्याने जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर, जिल्हा सक्षमीकरण अधिकारी कार्यालय, जि.प. लातूर, जिल्हा समाज कल्याण कार्यालय, , व संवेदना प्रकल्प हरंगुळ (बु.) यांच्या वतीने शनिवारी जिल्हयातील दिव्यांगांसाठी पर्पल फेअर-2025 चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटन जि.प. चे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी केंद्रीय सल्लागार समितीचे सदस्य सुरेश पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीप ढेले, दिव्यांग जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष डॉ. राजेश पाटील, राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तिकरण संस्था सिकंद्राबाद चे कार्यक्रम समन्वयक श्री राजेंद्र , वैद्यकीय उपअधिक्षक उध्दव माने, स्वाधार केंद्राचे अध्यक्ष हरिश्चंद्र सुडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी राजु गायकवाड , जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे कार्यवाह डॉ. योगेश निटूरकर, समिती सदस्य श्री विलास आराध्ये, श्री वैजनाथ होन्हाळे, डॉ. योगेश गवसाने, सुरज बाजुळके, श्रीमती सुमित्रा थोटे राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तिकरण संस्था सिकंद्राबाद चे माजी कार्यकारीणी समिती सदस्य श्री बस्वराज पैके यांची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांनी फीत कापून दिव्यांगांनी तयार केलेल्या विविध वस्तुकलेच्या स्टॉलचे उदघाटन करून त्यांच्या कलेचे कौतुक केले. प्रास्ताविकात राजु गायकवाड यांनी हा पर्पल फेअर प्रतिवर्षी गोवा येथे होत असून पिंपरी चिंचवड नंतर मराठवाड्यात प्रथमच लातूरात येथे होत असल्याचे सांगितले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी यांनी दिव्यांगाचा 5 टक्के सेस निधी सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या संस्थांनी उत्त्म वापर केल्याचे सांगत दिव्यांगांच्या विविध स्टॉलमधील कलेला दाद दिली. प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी लातूर विभागात प्रथमच अंधांसाठी विशेष टंकलेखन, मुकबधिर विद्यार्थ्यांचे स्काऊट गाईड व ढोल पथक राबविल्याचे सांगितले. तर सुरेश पाटील यांनी असा उत्सव जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनही व्हावेत तसेच दिव्यांगांच्या साहित्य व वस्तु प्रदर्शनाचे मार्केटींग आवश्यक असल्याचे विशेष नमुद केले. अतिरिक्त जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर,आणि संचालक , सामाजिक शास्त्रे संकुल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर पेठ चे श्री सागर कोंडेकर यांनी या कार्यक्रमास भेट देवून दिव्यांगांच्या कलागुणांना दाद दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व्यंकट लामजने, डॉ. मयुरी बिल्लावार यांनी केले. तर आभार जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी मानले. यशस्वीतेसाठी सहायक सल्लागार बाळासाहेब वाकडे, अण्णासाहेब कदम, बसवराज पैके यांच्यासह दिव्यांग शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर पेठ लातूर येथील सामाज कार्य शास्त्राच्या विद्यार्थी कु. रुकसार फुलारी, कु.साक्षी भोसले , कु.राधा वाघमारे , श्री अजय दांडेगावकर, श्री सुशांत गायकवाड, श्री तात्या काळे,श्री आनंद मानकोसकर , श्री संगमेश्वर भुरे, कु. शिवानी काळे, कु. वैष्णवी वैष्णव, कु. प्रियांका शिंदे, कु. श्रुती घोडके,कु श्राद्धा देवकत्ते, या विद्यार्थ्यांनी मदतनीस म्हणून कार्य केले.
08/11/2025