संवेदना प्रकल्पामध्ये दिव्यांग मुले व त्यांच्या पालकांचा निवासी प्रशिक्षण वर्ग प्रारंभ झाला
संवेदना प्रकल्पामध्ये दिव्यांग मुले व त्यांच्या पालकांचा निवासी प्रशिक्षण वर्ग प्रारंभ झाला
संवेदना प्रकल्पामध्ये दिव्यांग मुले व त्यांच्या पालकांचा निवासी प्रशिक्षण वर्ग प्रारंभ झाला. जी मुले ग्रामीण भागात आहेत, ज्यांच्या पर्यंत ऑक्युपेशनल, स्पीच, फिजिओथेरपी उपलब्ध होऊ शकत नाही अशा मुलांकरीता व त्यांच्या पालकांसाठी हा प्रशिक्षण वर्ग आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटन एम.आय.टी. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नवाब जमादार यांनी केले. यावेळी प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ. राजेश पाटील, नागपुर CRC चे ऑक्युपेशनल थेरपीस्ट डॉ. अश्विनी दाहत, स्पीच थेरपीस्ट श्री रतन जाधव शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दीपा पाटील होते. उद्घाटन सत्राचे संचालन फिजिओथेरपीस्ट डॉ. मयुरी यांनी केले.