दि. 30 जानेवारी 2019 रोजी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी आणि कुष्ठरोग निवारण – जागरण पंधरवाडा दिनाचे औचित्य साधून सक्षम लातुर जिल्हयाच्या वतिने दिव्यांगासाठी सेवा केंद्रांचे उद्घाटन झाले. उद्घाटक श्री कौस्तुभ दिवेगावकर (मा. आयुक्त लातुर महानरगपालीका), प्रमुख पाहुणे श्री प्रदिप नणंदकर (जिल्हा प्रतिनिधी दैनिक लोकसत्ता व दैनिक तरुण भारत), श्री विकास गाढवे(जिल्हा प्रतिनिधी दैनिक सकाळ) होते.
दिव्यांग सेवा केंद्रामध्ये दिव्यांगासाठी विविध योजनांची माहिती विहीत नमुन्यातील अर्ज, विविध प्रपत्र, ऑनलाईन पद्धतीने करावयाचे अर्ज इत्यादी विषयाची उपयुक्त माहिती श्री सुरेश पाटील (प्रकल्प कार्यवाह संवेदना, सक्षम राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य) यांनी दिली.
या कार्यक्रमात मा. आयुक्त श्री दिवेगावकर यांनी दिव्यांगासाठी स्थानिक स्वराज्या संस्थेच्या योजनेतून दिव्यांगाना प्राधान्याने मदत करण्याचे मान्य केले. यावेळी रेल्वे प्रवास सवलत कार्ड, निरामय कार्ड, व्हील चेअर, ट्रायसिकल्स चे वितरण करण्यात आले.
सक्षम चे जिल्हा उपाध्यक्ष श्री हरिशचंद्र सुडे, देवगीरी प्रांत सचिव श्रीराम शिंदे, सक्षम चे कार्यकर्ते श्री दिपक क्षीरसागर, श्री योगेश्वर बुरांडे, प्रा. सतिश सिरसाट, प्रा. कुमार त्रिमुखे, श्री योगेश शेळके, डॉ. पाचेगावकर यांची उपस्थिती होती. आभार प्रा. डॉ. भगवान देशमुख यांनी व्यक्त केले. कार्यक्रम सुत्र संचालन श्री व्यंकट लामजणे यांनी केले. यावेळी शासकीय अंध शाळेचे मुख्याध्यापक, विदयार्थी उपस्थित होते.