प्रजासत्ताक दिनानिमीत्त “संवेदना” शाळेमध्ये वैद्यकीय तपासणी शिबीर संपन्न
प्रजासत्ताक दिनानिमीत्त “संवेदना” शाळेमध्ये वैद्यकीय तपासणी शिबीर संपन्न
आज दि. 26 जानेवारी 2018 रोजी प्रजासत्ताक दिनानिमीत्त संवेदना बहुविकलांग मुलांच्या शाळेमध्ये मतिमंद व बहुविकलांग मुला-मुलींकरिता वैद्यकीय तपासणी शिबीर संपन्न झाले. सकाळी दंतरोगतज्ञ डॉ. अक्षय गिल्डा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर डॉ.गौरव सोमाणी (त्वचारोगतज्ञ), डॉ. पुष्पलता सोमाणी (दंतरोगतज्ञ), डॉ. अक्षय गिल्डा (दंतरोगतज्ञ), डॉ. गणेश कोटलवार (दंतरोगतज्ञ) यांनी मुलांची त्वचा व दातांची निगा घेण्याविषयी पालकांना मार्गदर्शन केले व मुलांची वैद्यकीय तपासणी केली. कार्यक्रमास संवेदना शाळेच्या शालेय समितीचे अध्यक्ष श्री. प्र.मा.जोशी, प्रकल्प समिती सदस्य डॉ.श्री. योगेश निटुरकर, मुख्याध्यापिका सौ. दीपा पाटील, पालक, विशेष शिक्षक, कर्मचारी वर्ग यांची उपस्थिती होती.