अपंग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे, समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद लातूर, यांच्या वतीने दिल्या जाणारा “ दिव्यांग संस्था प्रेरणा पुरस्कार 2019” (लातूर जिल्हा) सन्मान पत्र, रोख रक्कम अशा स्वरूपात लातूर येथील 'संवेदना' शाळेला, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते संवेदना शाळेचे अध्यक्ष अॅड. जगन्नाथ चित्ताडे यांना प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी,दि. 26/1/19 रोजी पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणावर शासकीय कार्यक्रमात देण्यात आला. यावेळी मा.खासदार डाॅ सुनील गायकवाड, लातूर मनपाचे मा.महापौर श्री. सुरेश पवार, लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे सीईओ श्री. बिपीन विटणकर, समाज कल्याण अधिकारी श्री मिनगीरे साहेब व इतर मान्यवर होते.