दि. ७/८/२०२५ लातूर- "तुमच्या दिव्यांग पाल्यासाठी अधिक वेळ आणि प्रेम द्या.. डॉ. क्लेलिआ किरण पाउलोस राष्ट्रीय बौध्दिक दिव्यांग सशक्तीकरण संस्था क्षेत्रीय कार्यालय, मुंबई, (NIEPID Regional Center, Mumbai), सक्षम लातूर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर कार्यान्वित अभिकृता: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत संचलित संवेदना प्रकल्प, हरंगुळ (बु) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बौद्धिक दिव्यांग पाल्यांच्या पालकांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आपले अपत्य दिव्यांग आहे याचे वाईट वाटून न घेता त्याच्यावर चांगले संस्कार करा, त्याच्यासाठी भरपूर वेळ आणि प्रेम द्या म्हणजे तुमचे अपत्य प्रगती तर करेलच पण तुमच्या मनावर असलेला ताण दूर होईल. याच बरोबर दिवसभरात वेळ काढून थोडा वेळ योगासने आणि प्राणायाम केलात तर तुमचा दिवस आनंदात जाईल" असे डॉ. क्लेलिआ किरण पाउलोस यांनी पालक आणि दिव्यांग बालकांसमोर बोलतांना आपले विचार व्यक्त केले. डॉ. क्लेलिआ किरण पाउलोस या राष्ट्रीय बौध्दिक दिव्यांग सशक्तीकरण संस्था क्षेत्रीय कार्यालय, मुंबई सेंटर में मुंबई येथे डॉ स्करण पावलस या सायकोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संवेदना प्रकल्याचे मा. अध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि पाहुण्यांचा परिचय जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे समिती सदस्य श्री सुरज बाजुळगे यांनी केले. विशेष शिक्षिका सौ शीतल सूर्यवंशी यांनी शीघ्र निदान व उपचार केल्यास दिव्यांगत्वाची तीव्रता कमी होऊ शकते असे मत व्यक्त केले. श्री. सुरज बाजुळगे यांनी दिव्यांगांसाठी लागणारे ओळख पत्र UDID चे महत्व सांगितले. 'जिव्हाळा' या पालकांच्या संघटनेबद्दल महाराष्ट्र परिचारिका संघटनेच्या राज्य सचिव सौ. सुमित्रा तोटे यांनी सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी आहारतज्ञ डॉ. शोभा जगदिश अग्रोया यांनी 'दिव्यांग मुलांचा आहार कसा असावा' याबाबत सखोल मार्गदर्शन केले आणि पालकांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली: दिव्यांग मुळे पाणी कमी पितात यावर बोलतांना डॉ. अग्रोया म्हणाल्या की, पाण्यात ग्लकॉन डी पावडर अथवा मध मिसळून पाणी पिण्यास द्यावे त्यामुळे ही मुले पाणी योग्य प्रमाणात पितील. श्री बस्वराज पैके यांनी निरामय आरोग्य विमा व रेल्वे पास बाबतची माहिती पालकांना दिली. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने पालक आणि संवेदना प्रकल्प संस्थापक कार्यवाह श्री सुरेशदादा पाटील, जिल्हा दिव्यांग पुनवर्सन केंद्र लातूरच्य प्रकल्प समितीचे सदस्य श्री विलास आराध्ये, श्री वैजनाथ व्हणाळे उपास्थित होते. श्री संतोष कोळगावे यांनी आभार मानले आणि कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. या २ दिवसाच्या शिबिरामध्ये लातूर जिल्ह्यातील एकूण ३२ दिव्यांगांची बुध्यांक तपासणी व ६० पालकांचे समुपदेशन करण्यात आले.
08/11/2025