संवेदनामध्ये कारगिल विजय दिवस साजरा, शहिदांना श्रद्धांजली
संवेदनामध्ये कारगिल विजय दिवस साजरा, शहिदांना श्रद्धांजली
संवेदनामध्ये कारगिल विजय दिवस साजरा, शहिदांना श्रद्धांजली
*सिमेवरील जवानांचे समर्पण हे संस्मरणीय - कॅ. कृष्णा गिरी*
लातूर / प्रतिनिधी : भारताच्या सिमेवरील तैनात असलेल्या आपल्या सर्व सैनिक बांधवांचे जवानांचे समर्पण व त्याग हे संस्मरणीय व वाखाणण्याजोगे असते असे प्रतिपादन मा. कॅ. कृष्णा गिरी यांनी केले. आज दि. २६ जुलै २०२५ रोजी ते लातूर तालुक्यातील हरंगुळ बु. येथे असलेल्या संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आयोजित कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी सर्व उपस्थित मान्यवर विद्यार्थी आणि कर्मचारी वृंद यांनी शहीद जवानांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मा. कॅप्टन कृष्णागिरी, मा. कॅप्टन विलासराव सूर्यवंशी, विश्वास व्यंकटराव चाटे, संस्थेचे कार्यवाह नाईक, संस्थेचे समन्वयक प्रवीण सगर सर, मा. श्री. विठ्ठल गाडेकर, संस्थेचे सदस्य श्री. व्यंकटजी लामजणे सर आणि सर्व कर्मचारी वृंद व 72 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने त्यांनी प्रत्यक्ष कारगिल युध्दात अनुभवलेले प्रसंग कथन केले. यात मा. कॅप्टन कृष्णागिरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शनपर भाषणात त्यांचे कारगिल युध्दातील अनुभव सांगितले. त्यानंतर मा. कॅप्टन विलासराव सूर्यवंशी यांनी देखील प्रत्यक्ष युध्दाचे अंगावर शहारे आणणारे प्रसंग सांगितले.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत विद्यार्थीनींच्या स्वागत गिताने करण्यात आले. यानंतर देशभक्ती पर गित संस्था संस्था सदस्य या. व्यंकटजी लामजणे सर यांनी सादर केले.
याप्रसंगी निदेशकामध्ये आकाश मगर सर, श्रीमती रासुरे, सिद्धांत मंडाळे, पूजा पाटील, मयूर दंडे आणि कुमारी रेणुका श्रीमंगले
यांच्यासह विद्यार्थी व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.