डॉ. भालचंद्र ब्लड बँकेमध्ये थॅलेसिमिया मेजर HLA तपासणी शिबीर संपन्न
डॉ. भालचंद्र ब्लड बँकेमध्ये थॅलेसिमिया मेजर HLA तपासणी शिबीर संपन्न
डॉ. भालचंद्र ब्लड बँकेमध्ये थॅलेसिमिया मेजर HLA तपासणी शिबीर संपन्न*
दि. 22 जून2025 रोजी डॉ. भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहा मध्ये ग्रांट मेडिकल फाऊंडेशन रुबी हॉल क्लीनिक, पुणे, डॉ. भालचंद्र रक्तपेठी, लातूर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर कार्यान्वित अभिकर्ता संवेदना प्रकल्प हरंगुळ( बू) लातूर, जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद लातूर यांच्या संयुक्त विद्यमानाने थॅलेसिमिया मेजर HLA तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन अष्टवक्रऋषि यांच्या प्रतिमा पुजनाने करण्यात आले. डॉ. भालचंद्र ब्लड बँकेचे मा. अध्यक्ष डॉ.मन्मन्थ भातांब्रे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. थॅलेसिमिया आजारविषयी त्यांनी माहिती दिली व भालचंद्र रक्तपेढी थॅलेसिमियाग्रस्त दिव्यांगांना कशापद्धतीने मदत करते याविषयी सविस्तर माहिती दिली.
यावेळी भालचंद्र ब्लड बँकेचे कार्यवाह श्री विनोदजी कुचेरिया यांनी थॅलेसिमिया रुग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधा व डॉ भालचंद्र ब्लड बँकेच्या वतीने सुरू केलेल्या थॅलेसिमिया डे केअर सेंटर बद्दल आपले
मनोगत व्यक्त केले.
रुबी हॉल क्लीनिक, पुणे येथील हिम्याटॉलॉजिस्ट डॉ. अभिजीत बाहेती यांनी थॅलेसिमिया विषयी माहिती दिली. थॅलेसीमिया हा अनुवंशिक आजार असुन त्याचे कारणे, उपचार व त्यावरील उपाय योजना याविषयी अत्यंत मोलाचे मागदर्शन केले. तसेच HLA तपासणी व बोनमॅरो ट्रान्सप्लान्ट या विषयी माहिती दिली. रूबी हॉल थॅलेसिमिया रुग्णांसाठी निस्वार्थ भावनेने कार्य करते. बोन मॅरो ट्रान्सप्लांट साठी लागणार खर्च त्याबरोबर निवास व भोजन सुविधा निःशुल्क असल्याची माहिती दिली.
यानंतर थॅलेसिमियाग्रस्त रुग्णांच्या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले व यावेळी प्रशनोत्तर सत्रही घेण्यात आले.
या शिबिरात एकूण 36 रुग्ण सहभागी झाले होते यामध्ये रुग्णांच्या एकूण 45 नातेवाईकांची(डोनरची) तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर येथील विशेष शिक्षिका सौ. शितल सूर्यवंशी यांनी केले तर आभार डॉ भालचंद्र ब्लड बँकेचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉ योगेश गावसाणे यांनी केले. यावेळी संवेदना प्रकल्पाचे कार्यवाह डॉ . योगेशजी निटुरकर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य श्री वैजीनाथ व्हणाले, श्री पारसजी कोचेटा, रुबी हॉल क्लिनिकचे
श्री देवेंद्र रासकर, श्री अलीम शेख, कु किर्ती मेढंपूरकर, कु तृप्ती गुडे, श्री सचीन शिंदे, श्री मनिष मोहीते, श्री हेमंत राऊत तसेच थॅलेसिमिया ग्रस्त रुग्ण व त्यांचे पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे श्री संतोष कोळगावे, श्री कृष्णा पोतदार व सौ अन्नपूर्णा बनछेरे यांनी परिश्रम घेतले.