दिव्यांग बालकांची आरोग्य तपासणी व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत शिबि
दिव्यांग बालकांची आरोग्य तपासणी व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत शिबि
दि. ०६/०६/२०२५ रोजी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय लातूर, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद लातूर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर व श्री गजानन बहुउद्देशीय संस्था, बोरी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त *दिव्यांग बालकांची आरोग्य तपासणी व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत शिबिर* संत गाडगेबाबा अनाथ मतीमंद मुलांचे बालगृह, येथे घेण्यात आले. यावेळी 130 विद्यार्थ्यांची व कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली व त्यांना योग्य तो औषधोउपचार देण्यात आले. अपस्मार (epilepsy) असलेल्या दिव्यांग मुलांना मोफत औषधोपचार नियमितपणे देण्याची उपययोजना करण्यात आली. तसेच तीस जनांचे आयुष्यमान कार्ड काढण्यात आले. डॉ. पूनम राठोड वैद्यकीय अधिकारी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लातूर, श्री हेमंत लोहारे , शिबिर समन्वय, डॉ. प्रज्ञा पाटील सहाय्यक प्राध्यापक ( कान घसा विभाग ), डॉ. गौरव सोमाणी वरिष्ठ निवासी अधिकारी, डॉ. दिपाली बुरकुले, डॉ . अनुजा भटाने (नेत्र चिकित्सा), डॉ. राहुल नराळे (त्वचा रोग) डॉ अक्षय सलगर (शैल्य चिकित्सा), डॉ. प्रतिक गुंडरे (अस्थिरोग चिकित्सा), डॉ. सुदर्शन मुंडे (बालरोग चिकित्सा) डॉ. सुप्रिया ढगे ( स्त्रीरोग चिकित्सा), डॉ. नीलम होजे (दंत चिकित्सा),व डॉ. श्रद्धा निटूरे (मनोरुग्ण चिकित्सा) यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांची व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली व त्यांना श्रीमती आरती रसाळ (औषध निर्माता), यांनी औषध पुरवठा केला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर्वांना वृक्षारोपण करण्यासाठी प्रत्येकी एक रोप देण्यात आले. यावेळी श्री गजानन बहुउद्देशीय संस्थेचे सचिव श्री अण्णा कदम, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे व्यवस्थापक श्री बसवराज पैके, संगणक तज्ञ श्री कृष्णा पोतदार, श्री सचिन औसेकर, नरसिंग श्रीमंगले, सामाजिक शास्त्राचे विद्यार्थी, श्री बालाजी वडे, श्री सागर मुळे, श्री कपिल, श्री प्रबुद्ध कांबळे, यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यावेळी दिव्यांग विद्यार्थी, मुख्याध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.