सेविका व आरोग्य सेवक यांच्यासाठी रेटीनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी निदान व उपचार या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली
सेविका व आरोग्य सेवक यांच्यासाठी रेटीनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी निदान व उपचार या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली
दि. ०८/०४/२०२५ रोजी विवेकानंद वैद्यकीय फौंडेशन व संशोधन केंद्र, लातूर, चिंतामण परांजपे दृष्टिदान प्रकल्प, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर, जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा परिषद लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने अशा सेविका व आरोग्य सेवक यांच्यासाठी रेटीनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी निदान व उपचार या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे प्रास्ताविक विवेकानंद रुग्णालयाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ गौरी कुलकर्णी यांनी केले. रेटिना सर्जन डॉ. मयूर कुलकर्णी यांनी रेटिंनोपेथी ऑफ प्रीमॅच्युरिटी ही वेळेच्या आधी जन्म झालेल्या नवजात बालकांचे निदान व उपचार कसे करावेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अश्या नवजात बालकांची ROP तपासणी मध्ये निदान झाल्यास योग्य उपचार करून त्यांची दृष्टी वाचू शकते व पुढील होणारे दुष्परिणाम टाळता येतात. जर ROP तपासणी झाली नाही व त्या नवजात बालकास ROP झाले तर कायमस्वरूपी अल्प दृष्टी किंवा अंधत्व होऊ शकते त्यामुळे ROP तपासणी अत्यावश्यक असल्याचे डॉ मयुर कुलकर्णी यांनी सांगितले.
विवेकानंद रुग्णालयाचे अध्यक्ष श्री अनिलजी अंधोरीकर यांनी विवेकानंद रुग्णालयामार्फत देण्यात येणाऱ्या विविध आरोग्यसेवांबद्दल सविस्तर माहिती दिली. संवेदना प्रकल्पाचे कार्यवाह डॉ योगेशजी निटुरकर यांनी संवेदना प्रकल्पांतर्गत दिव्यांगांसाठी चालणाऱ्या सर्व प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा बद्दल विशेष माहिती दिली. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या विशेष शिक्षिका सौ शितल हिप्परगेकर यांनी शिघ्र निदान व उपचार याबाबत माहिती दिली, तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे भाषा व वाचा उपचार तज्ञ डॉ रतन जाधव यांनी वेळीच मुलांच्या भाषा व वाचा विकास या विषयावर मार्गदर्शन केले. जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री संतोषकुमारजी नाईकवाडे यांनी 5% राखीव निधी कश्या पध्दतीने दिव्यांगांसाठी खर्च केला जातो याबद्दल माहिती दिली.
तसेच येणारा सप्ताह हा संविधान सप्ताह म्हणून साजरा करण्याचे सर्वांना अहवान केले. जिल्हा समाज कल्याणचे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता श्री राजूजी गायकवाड यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून घेतले, तसेच आरोग्य विभाग जिल्हा परिषद लातूरच्या सौ संगीता डावरे यांनी आशा सेविका यांच्यामार्फत चालणाऱ्या विविध कार्याची माहिती दिली.
विवेकानंद रुग्णालयाच्या डॉ अंजली सावरगावकर यांनी कर्करोग प्रतिबंध, तपासणी, निदान व उपचार याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी अशा सेविका, त्यांचे मार्गदर्शक व मान्यवर उपस्थित होते.