जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर यांच्या वतीने जागतिक डाऊन सिंड्रोम २०२५ दिनानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जनजागृती करण्यात आली
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर यांच्या वतीने जागतिक डाऊन सिंड्रोम २०२५ दिनानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जनजागृती करण्यात आली
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर यांच्या वतीने जागतिक डाऊन सिंड्रोम २०२५ दिनानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जनजागृती करण्यात आली.*
दि. २१/०३/२०२५ रोजी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर यांच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक कार्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना निळ्या व पिवळ्या रंगाच्या रिबीन लावून डाऊन सिंड्रोम या दिव्यांगत्वाबद्दल माहिती देण्यात आली. श्री बसवराज पैकी यांनी डाऊन सिंड्रोम या दिव्यांगत्वा बाबत सविस्तर माहिती दिली.
डाऊन सिंड्रोम हा एक दिव्यांगत्वाचा प्रकार आहे. डाउन सिंड्रोम ही स्थिती त्या व्यक्तीच्या गुणसुत्रीय असंतुलनामुळे तयार होते.
2012 सालापासून जागितक डाउन सिंड्रोम दिन 21 मार्च रोजी साजरा व्हायला सुरुवात झाली.
त्याअनुषंगाने लायन्स क्लबच्या वतीने डाऊन सिंड्रोम दिव्यांग मुलांना शैक्षणिक साहित्य वितरीत करण्यात आले.यावेळी लायन्स क्लब लातूरचे अध्यक्ष डॉ. अजय नारायणकर, सचिव डॉ. अश्विनी नारायणकर, कोषाध्यक्ष सौरभ सुतार, संवेदना प्रकल्पाचे कार्यवाह डॉ. योगेश निटूरकर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य श्री वैजनाथ व्हणाळे, वाचा व उपचार तज्ञ डॉ रतन जाधव, भौतिक उपचार तज्ञ डॉ .पल्लवी जाधव, श्री बस्वराज पैके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन जाधव, वैद्यकीय अधिकारी डाॅ. स्नेहल संगले, डॉ. यशोदा बोंडगे, डॉ. अंजली सूर्यवंशी, डॉ भरडले, डॉ. सुनील होळीकर, डॉ. किरण होळीकर डॉ. मयुरी मोरे डॉ. प्रतिभा संपते. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे श्री बसवराज पैके, श्रीमती शितल हिप्परगेकर, श्रीमती वैष्णवी तावरे, श्री संतोष कोळगावे, दिव्यांगजन व त्यांचे पालक उपस्थित होते.