दिव्यांग खेळांडूच्या दि. 21 ते 23-मार्च 2025 रोजी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा रेशिमबाग क्रीडांगण, नागपूर येथे संपन्न झाले
दिव्यांग खेळांडूच्या दि. 21 ते 23-मार्च 2025 रोजी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा रेशिमबाग क्रीडांगण, नागपूर येथे संपन्न झाले
दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य,व स्व. प्रभाकरराव दटके स्मृती सेवा प्रतिष्ठान संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग खेळांडूच्या दि. 21 ते 23-मार्च 2025 रोजी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा रेशिमबाग क्रीडांगण, नागपूर येथे संपन्न झाले
या मध्ये रा.स्व.संघ जनकल्याण समिती संचलित संवेदना शाळा हरांगुळ - लातूर मधील कु.मानवी दयानंद पाटील ने (वयोगट -13 ते 16 ) 25 मीटर चालणे या खेळ प्रकारामध्ये *प्रथम* व संवेदना औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील
कु.सुमेधा राजेश्वर देशमुख ने (वयोगट 21 ते 25) 25 मीटर चालणे खेळ प्रकारामध्ये *प्रथम* क्रमांकाचे बक्षीस मिळवले. चि.आदिनाथ सलगर ने (वयोगट - 21 ते 25) - गोळा फेक या क्रीडा प्रकारामध्ये द्वितीय क्रमांक बक्षीस प्राप्त केले आहे. राज्यस्तरीय स्पर्धे करता संवेदना प्रकल्पातील विद्यार्थी
1) चि.विराज बिराजदार
2) चि.यश सावळकर
3)चि.पांडव राडकर
4)कु. साक्षी हंचाटे
5) कु. वैष्णवी गोणे
6)चि.शकील मुल्ला
7)चि.दादासाहेब सरगर
8)चि.ज्ञानेश्वर काळे
9)चि.निखिल इंजे
या सर्व विद्यार्थ्यांनी विविध खेळ प्रकारात सहभाग नोंदवला. या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये श्री. सचिन राऊत (क्रीडा शिक्षक) , श्री. योगेश्वर बुरांडे (संगीत शिक्षक), सौ. जयश्रीताई माने (विशेष शिक्षिका),सौ.सुप्रिया हंचाटे (पालक) , सौ. माधुरी देशमुख (पालक), श्री. अमोल बंडगर (काळजी वाहक), श्री. अमर खाडप (वाहन चालक) या प्रसंगी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. क्रीडा शिक्षक चन्नय्या स्वामी यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ राजेश पाटील व कार्यवाह डॉ योगेश निटूरकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले