धाराशिव जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांगांनी कृत्रिम अवयव बसवून आपले जीवन सुकर करावे - जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे
धाराशिव जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांगांनी कृत्रिम अवयव बसवून आपले जीवन सुकर करावे - जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे
धाराशिव जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांगांनी कृत्रिम अवयव बसवून आपले जीवन सुकर करावे - जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे
जिल्हा प्रशासन, समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद धाराशिव, स्थानिक स्तर समिती सदस्य रा.स्व.संघ जनकल्याण समिती संवेदना प्रकल्प, एस. आर. ट्रस्ट व अलिम्को संयुक्त विद्यमाने धाराशिव जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम, हात पाय कॅलिपर मोजमाप व तत्काळ वितरण शिबिर होत आहे. दि. 21 जानेवारी रोजी धाराशिव व कळंब तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी पंचायत समिती धाराशिव येथे शिबिर संपन्न झाले. याचे उद्घाटन मा.जिल्हाधिकारी श्री. सचिनजी ओंबासे यांच्या हस्ते झाले. श्री मैनाक घोष मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव यांनी शिबिरास भेट देऊन समाधान व्यक्त केले. प्रसंगी जिल्हाधिकारी महोदयांनी जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले. जनकल्याण समिती, व एस. आर. ट्रस्ट यांना धन्यवाद दिले. पुढील शिबिर दि. 22 जानेवारी रोजी श्रमजीवी फार्मसी कॉलेज उमरगा, दि. 23 जानेवारी रोजी भारत माता मंदिर लोहारा, दि. 24 जानेवारी रोजी पंचायत समिती सभागृह, तुळजापूर, दि. 25 जानेवारी रोजी पंचायत समिती भूम येथे शिबिर होणार आहे. शिबिर बाबत समन्वयक श्री व्यंकट लामजने यांनी माहिती दिली, तांत्रिक माहिती अलिम्को चे डॉ. रुक्मिणी सोनेवाड, डॉ रुपेश जाधव यांनी दिली.
कृत्रिम साहित्य मिळाल्याबद्दल दिव्यांग व्यक्तींनी समाधान व्यक्त केले. शिबिरामध्ये स्वयंसेवक म्हणून श्री. व्यंकटेश महाजन महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी दिव्यांग व्यक्तींना सहकार्य केलें.
शिबिरास पोनि वासुदेव मोरे, डॉ रुक्मिणी सोनेवाड, डॉ. फुलारी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, समाजकल्याण विभागाचे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता श्री. सच्चिदानंद बांगर, श्री. सतीश कोळगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास सक्षम, जनकल्याण समितीचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले