दि. 9 जानेवारी 2025 रोजी दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव मोजमाप व तात्काळ वितरणाचे जिल्हास्तरीय शिबीर सक्षम दिव्यांग सेवा केंद्र उदगीर येथे संपन्न झाले
दि. 9 जानेवारी 2025 रोजी दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव मोजमाप व तात्काळ वितरणाचे जिल्हास्तरीय शिबीर सक्षम दिव्यांग सेवा केंद्र उदगीर येथे संपन्न झाले
दि. 9 जानेवारी 2025 रोजी दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव मोजमाप व तात्काळ वितरणाचे जिल्हास्तरीय शिबीर सक्षम दिव्यांग सेवा केंद्र उदगीर येथे संपन्न झाले. दिव्यांग व्यक्तींकरिता कृत्रिम हात, पाय, स्प्लींट, कॅलीपर मिळण्याकरिता उदगीर येथील शिबीराचे उदघाटन मा जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री संतोषकुमार नाईकवाडे, श्री राजू गायकवाड( वै सा का), श्री बाळासाहेब वाकडे (सा. सल्लागार) जिल्हा समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद लातूर , अलीमकोचे कृत्रिम अवयव तज्ञ डॉ. रुपेश जाधव, श्रीमती रुक्मिनी सोनेवाड, सक्षम उदगीरचे श्री शंकराप्पा लासुने, डॉ दत्तात्रय पाटील, डॉ कालिदास बिराजदार, डॉ संजय कुलकर्णी, श्री संतोष कुलकर्णी, डॉ संजय तेलंग, श्री रविकिरण बालकुंदे, श्री श्रीपाद श्रीमंतकर, जीवन विकास कर्मशाळेचे मुख्याध्यापक श्री राजा मलिक पटेल, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे श्री व्यंकट लामजणे, श्री बसवराज पैके, श्री नवाज शेख, श्री संतोष कोळगावे व मुख्याध्यापक, विशेष शिक्षक, कर्मचारी, दिव्यांग व दिव्यांगाचे पालक उपस्थित होते. या शिबिरात 120 दिव्यांगाची तपासणी करून त्यांना तात्काळ कृत्रिम साहित्य देण्यात आला.
जिल्हा प्रशासन, समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद, लातूर, अलीमको, एस. आर. ट्रस्ट मध्य प्रदेश, व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींकरिता कृत्रिम हात, पाय, स्प्लींट, कॅलीपर मोफत बसविण्यासाठी तपासणी व तात्काळ (ऑन दि स्पॉट) साहित्य वितरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.