दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव मोजमाप व तात्काळ वितरणासाठी जिल्हास्तरीय शिबीराचे आयोजन
दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव मोजमाप व तात्काळ वितरणासाठी जिल्हास्तरीय शिबीराचे आयोजन
दि. 7 जानेवारी 2025 रोजी दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव मोजमाप व तात्काळ वितरणासाठी जिल्हास्तरीय शिबीराचे आयोजन श्रीनिवास निवासी मतिमंद विद्यालय व श्री पांडुरंग निवासी मूकबधिर विद्यालय औसा येथे करण्यात आले होते.
दिव्यांग व्यक्तींकरिता कृत्रिम हात, पाय, स्प्लींट, कॅलीपर मोजमाप ववितरण शिबीराचे उदघाटन केंद्रीय सल्लागार समितीचे सदस्य श्री सुरेशदादा पाटील यांच्या शुभहस्ते झाले. प्रसंगी मा. जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री. संतोषकुमार नाईकवाडी, अहिल्यादेवी होळकर शिक्षण प्रसारक मंडळ, उदगीर या संस्थेचे सहसचिव श्री व्यंकटेश कोरवाड, अलीमकोचे कृत्रिम अवयव तज्ञ डॉ. रुपेश जाधव, श्रीमती रुक्मिनी सोनेवाड, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे श्री. व्यंकट लामजणे, श्री बसवराज पैके, श्री नवाज शेख, श्री संतोष कोळगाव व निवासी मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री व्यंकट तोटरे, श्री पांडुरंग निवासी मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बब्रुवान अलट , विशेष शिक्षक कर्मचारी व दिव्यांग व दिव्यांगाचे पालक यांची उपस्थिती होती.
जिल्हा प्रशासन, समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद, लातूर, अलीमको, एस आर ट्रस्ट, मध्य प्रदेश व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.