दिव्यांगांसाठी जिल्हास्तरीय शिबीराचे उदघाटन दि. 6 जानेवारी 2024 रोजी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर येथे दिव्यांग व्यक्तींकरिता कृत्रिम हात, पाय, स्प्लींट, कॅलीपर मिळण्याकरिता शिबीराचे उदघाटन समाजकल्याण विभागाचे मा. प्रादेशिक उपायुक्त, श्री. अविनाशजी देवसटवार यांच्या शुभहस्ते झाले. प्रसंगी मा. जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री. संतोषकुमार नाईकवाडी, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता श्री. राजू गायकवाड, संवेदना प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ. राजेशजी पाटील, सहकार्यवाह श्री. प्रविणजी सगर, जिल्हा जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या स्थानिक व्यवस्थापन समिती चे सदस्य श्री विलास आराध्ये, सौ. सुमित्रा तोटे, अलीमकोचे कृत्रिम अवयव तज्ञ डॉ. रुपेश जाधव, श्रीमती रुक्मिनी सोनेवाड, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे श्री. व्यंकट लामजणे, श्री बसवराज पैके, सौ. शीतल सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा प्रशासन, समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद, लातूर, अलीमको एस आर ट्रस्ट व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींकरिता कृत्रिम हात, पाय, स्प्लींट, कॅलीपर मोफत बसविण्यासाठी तपासणी व तात्काळ (ऑन दि स्पॉट) साहित्य वितरण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शिबीराचे खालील प्रमाणे करण्यात आल्याचे श्री. व्यंकट लामजणे यांनी सांगीतले. अ.क्रं. तालुका दिनांक शिबीराचे ठिकाण संपर्क 1 लातूर, रेणापूर 06.01.2025 जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, वि.दे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर श्री. बस्वराज पैके - 9075306299 2 औसा 07.01.2025 श्रीनिवास निवासी मतिमंद विद्यालय, नाथ नगर, केदारनाथ मंगल कार्यालयाच्या पाठीमागे, औसा ता.औसा. जि.लातूर श्री. व्यंकट तोटरे - 9673629365 3 निलंगा, शिरुर अनंतपाळ 08.01.2025 अशोकराव पाटील निलंगेकर निवासी मुकबधीर विद्यालय, शिवाजी नगर, आडत लाईनच्या पाठीमागे, निलंगा, जि.लातूर श्री. बालाजी डावळे – 9158356202, 9881425590 4 उदगीर, देवणी, जळकोट 09.01.2025 सक्षम सेवा केंद्र, विवेकानंद वसतीगृह, जळकोट रोड, उदगीर श्री. बस्वराज पैके - 9075306299 5 अहमदपूर, चाकुर 10.01.2025 श्री. संत ज्ञानेश्वर निवासी मतिमंद विद्यालय, सैनिक कॉलनी, टेंभूर्णी रोड, अहमदपूर जि.लातूर श्री. विकास तपसाळे - 9975072777 6 लातूर जिल्ह्यातील वरील तारखेस येऊ न शकलेले उर्वरीत सर्व दिव्यांगजन 11.01.2025 जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, वि.दे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर श्री. बस्वराज पैके - 9075306299 या प्रसंगी प्रादेशिक उपायुक्त मा.श्री. अविनाश देवसटवार यांनी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर यांच्या वतीने जिल्ह्यामध्ये दिव्यांगांसाठी करण्यात येणाऱ्या कार्याबद्दल कौतुक केले. दिव्यांगांसाठी तात्काळ (ऑन दि स्पॉट) साहित्य देण्यात येत असल्याने दिव्यांग व्यक्तींना याचा खुप लाभ होत असून जिल्ह्यामध्ये अधिकाधिक दिव्यांगांना मोठा लाभ होणार असल्याचे सांगीतले. जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री. संतोषकुमार नाईकवाडी यांनी जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींनी या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन केले. संवेदना प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ.राजेशजी पाटील यांनी संवेदना प्रकल्प जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून विविध सेवा देत असून दिव्यांग व्यक्तींनी उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. व्यंकट लामजणे यांनी केले तर आभार वैसाका श्री. राजू गायकवाड यांनी मानले. श्री. सोमेश्वर कलशेट्टी यांना कृत्रिम हात, खलील सय्यद यांना स्प्लींट चे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शिबीरात येणाऱ्या दिव्यांग व्यक्तींकरिता समर्पण ट्रस्ट लातूर यांच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. समर्पण ट्रस्टच्या टीमचे मान्यवरांच्या वतीने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे श्री संतोष कोळगावे, श्री आकाश जोशी, सौ अन्नपुर्णा बंछरे तसेच समाजकल्याण विभागातील अधिकारी कर्मचारी, पालक, दिव्यांग व्यक्ती यांची उपस्थिती होती.
22/01/2025