जागतिक ब्रेल लिपि दिनानिमित्त विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी व दिव्यांग विषयी जनजागृती साठी दिव्यांग प्रवर्गाची प्रदर्शनी लावण्यात आली.
जागतिक ब्रेल लिपि दिनानिमित्त विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी व दिव्यांग विषयी जनजागृती साठी दिव्यांग प्रवर्गाची प्रदर्शनी लावण्यात आली.
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर च्या वतीने जागतिक ब्रेल लिपि दिनानिमित्त श्री वेताळेश्वर शैक्षणिक संकुल, लातूर येथे विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी व दिव्यांग विषयी जनजागृती साठी दिव्यांग प्रवर्गाची प्रदर्शनी लावण्यात आली. दि. ०४/०१/२०२५ शनिवार रोजी जागतिक ब्रेल लिपी दिन व लुईस ब्रेल यांच्या २१६ व्या जयंतीनिमित्त जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर, चिंतामण परांजपे दृष्टीदान प्रकल्पांतर्गत विवेकानंद वैद्यकीय फाऊंडेशन व संशोधन केंद्र, लातूर, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री वेताळेश्वर शैक्षणिक संकुल, लातूर येथे नेत्र तपासणी शिबिर व दिव्यांग जनजागृती व्हावी म्हणून दिव्यांग प्रवर्गाचे प्रदर्शन लावण्यात आले होते. प्रथम लुईस ब्रेल व देवी सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनी विद्यालयातील ३५० विद्यार्थ्यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसर पेठ येथील एम एस डब्ल्यू च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थांनी प्रत्येक दिव्यांग प्रवर्गाची माहिती घेतली. यावेळी एकूण १०८ विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. श्री वेताळेश्वर शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष श्री भीमाशंकरजी बावगे, सचीव श्री वेताळेश्वरजी बावगे, कोषाध्यक्ष श्री शिवलींगजी जेवळे, लातूर काॅलेज ऑफ फिजिओथेरपीचे प्राचार्य डॉ विरेंद्रजी मेश्राम, डॉ श्रीनिवास भुमरेला, नर्सिंगच्या प्राचार्या श्रीमती रुपाली गीरी, राजिव गांधी इन्स्टीट्यूट ऑफ पाॅलिटेक्निकचे प्राचार्य श्री संतोष मेंदगे, प्रा. डॉ. पल्लवी तायडे, श्री डॉ. अखिलेश बिवलकर, डॉ. श्रध्दा नागमोडे, डॉ शारदा धांडे, डॉ. गायत्री बटकुलवार, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर चे बहुउद्देशीय पुनर्वसन कार्यकर्ता श्री बस्वराज पैके, सामाजिक बहुउद्देशीय कार्यकर्ता श्री संतोष कोळगावे, विवेकानंद रुग्णालयाचे श्री सुजीत बोरसुरीकर, श्री सचिन मानकोस्कर, श्री श्रीकांत तुरटवाड, श्री देशपांडे , श्री ज्ञानेश्वर बनसोडे, विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते. एम.एस. डब्लू. वर्षाचे विद्यार्थी कु. साक्षी भोसले, कु. राधा वाघमारे चि. आनंद मानकोसकर , चि. संगमेश्वर भुरे यांनी प्रदर्शनी यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.