जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात संवेदना दिव्यांग आय.टी.आय. हरंगुळ (बु.) लातूर संस्थेतील ड्रेस मेकिंग विभागाने बनवलेला ड्रेस ड्रेपिंग मॉडेल ने वेधले लक्ष महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत शासकीय आय.टी.आय. लातूर येथे जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शन 2024 चे आयोजन दि. 26 डिसेंबर 2024 रोजी करण्यात आले होते. या तंत्र प्रदर्शनाचे उद्घाटन मा. आ. श्री. विक्रमजी काळे यांचे हस्ते झाले. प्रदर्शनात जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी आय.टी.आय. एकूण 19 संस्थांनी विविध व्यवसायातून 63 नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट्स सादर करून आपला सहभाग नोंदवला होता. संवेदना दिव्यांग आय.टी.आय. हरंगुळ (बु.) लातूर या संस्थेने प्रथमतः या प्रदर्शनात आपला सहभाग नोंदवला. ड्रेस मेकिंग या व्यवसायातून ‘ड्रेस ड्रेपिंग’ माध्यमातून नवीन फॅन्सी ड्रेस शिवण्यापुर्वी नमुना स्वरुपात अत्यल्प खर्चात बनवलेल्या या फॅन्सी पेपर ड्रेसला प्रथम पसंती मिळाली. याच बरोबर या विभागांतर्गत पर्यावरणपुरक कापडी पिशवी, हॅगिंग बॅग, पर्स, शैक्षणिक मॉडेल जॉब – बलून फ्रॉक, बेबी योक फ्रॉक, असिमेट्रीकल बेबी फ्रॉक, फॅन्सी अम्ब्रेला फ्रॉक तसेच वन पीस ड्रेस, वेस्टर्न थ्री पीस ड्रेस, स्मोकिंग सॅम्पल, अम्ब्रेला घागरा, किड्स नऊवारी साडी, ब्लाउजचे प्रकार, हस्तकला जॉबचे प्रदर्शनात सादरीकरण करण्यात आले. हे जॉब निदेशिका कु. पुजा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग प्रशिक्षणार्थी – कु. लता खैरे, कु. वैष्णवी शिंदे, कु. राधिका मगर, कु. वैष्णवी गोणे, चि. अजीज शेख, चि. हिराचंद सुळ, कु. क्रांती शेळके, सौ. सारिका हुळमजगे यांनी तयार केले होते. या व्यवसायातून सादर करण्यात आलेल्या मॉडेलचे जिल्हास्तरीय नामांकनासाठी पहिल्या 10 विजयी पारितोषकासाठी निवड झाली व राज्यस्तरासाठी निवड करण्यात आली आहे. परितोषकाचे स्वरूप सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह मा. श्री. औताडे पी.जे. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी लातूर, श्री. सुनील जाधव प्राचार्य औ.प्र.संस्था यांच्या शुभहस्ते व श्री. सुरेशदादा पाटील, प्राचार्य श्री. माळकुंजे, प्राचार्य श्री. बिराजदार, प्राचार्या कु. रनभिडकर तसेच संवेदना प्रकल्पातील श्री. राहुल देशपांडे, समन्वयक श्री. विठ्ठल के. गाडेकर, प्राचार्य श्री. आकाश मगर, श्री. व्यंकट लामजणे सर तसेच जिल्हा आय.टी.आय.तील श्री. के.आर.भराटे, श्री. आनंद शेंद्रे, श्री. अविनाश डोंगरे, श्री. सचिन डोंगरे, श्री. आनंद ठकार यांच्या प्रमुख उपस्थित पारितोषक वितरण झाले. या संस्थेतील इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स विभागाने देखील ‘बॉटल फिलिंग प्लांट’ आणि ‘इलेक्ट्रोमॅग्नेटीक इंडक्शन / मोटार रोटर ॲक्शन’ हे दोन मॉडेल्सचे सादरीकरण केले. निदेशक श्री. आकाश मगर तसेच दिव्यांग प्रशिक्षणार्थी आकाश क्षिरसागर, बालाजी पोले, श्रीकांत एकलिंगे, ऋतुजा गवते, बसवेश्वर कर्के, निलेश भालेराव, प्रतिक्षा आदुडे यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. संस्थेच्या या प्रथम वर्ष जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शन 2024 जिल्हास्तरीय झालेले नामांकन व राज्य शासनाकडे झालेली निवड याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्री. राजेशजी पाटील, डॉ. श्री. योगेश निटूरकर, श्री. सुरेशदादा पाटील,श्री. श्यामकुमार भराडिया, श्री. राहुल देशपांडे, श्री. विठ्ठल गाडेकर, श्री. व्यंकट लामजणे व सर्व सन्मानीय सदस्यांनी सर्व निदेशक व प्रशिक्षाणार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या वेळी साईन लँग्वेज टीचर श्री. सिद्धांत मंडाळे, श्रीमती शुभांगी रासुरे, श्री. मयुर दंडे, श्री. अमर खाडप व श्री. आत्माराम पळसे यांनी परिश्रम घेतले.
22/01/2025