संवेदना प्रकल्पातील 18 दिव्यांग विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड
संवेदना प्रकल्पातील 18 दिव्यांग विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड
संवेदना प्रकल्पातील 18 दिव्यांग विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड
दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद, लातूर तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा दि. 6 डिसेंबर 2024 रोजी बाभळगाव येथील पोलीस मैदानावर संपन्न झाल्या. क्रीडा स्पर्धेचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनमोल सागर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्या हस्ते झाले. दिवसभर चाललेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्र हरंगुळ (बु) येथील बहुविकलांग विद्यार्थी व संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील आय टी आय चे प्रशिक्षणार्थी यांनी सहभाग घेतला.
संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्रास बहुविकलांग प्रवर्गाचे सर्वसाधारण विजेतेपद मिळाले. एकूण 13 विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. 13 विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे. यामध्ये बहुविकलांग गटामध्ये चि. पांडव राडकर, कु. मानवी पाटील, कु. साक्षी हंचाटे,चि. विराज बिराजदार,चि. यश सावळकर, कु. अनुष्का शिंदे, कु. हुमेरा पठाण, चि. निखील इंजे, कु. सुमेधा देशमुख, कु.वैष्णवी गोणे यांनी प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे.
संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या एकूण 7 विद्यार्थ्यांना यश मिळाले. यापैकी 5 जणांची राज्यस्तरावर खेळण्याकरिता निवड करण्यात आली आहे. यामध्ये चि. आदिनाथ सलगर – गोळा फेक प्रथम, चि. शकील मुल्ला – 400 मी. धावणे प्रथम, चि. दादासाहेब सरगर – 200 मी. धावने प्रथम, चि. ज्ञानेश्वर काळे – बुद्धीबळ प्रथम, कु. प्रतिक्षा आदुडे – 100 मी धावने यांची राज्यस्तरावर निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांकरिता संवेदना शाळेतील श्री. योगेश्वर बुरांडे, क्रीडा शिक्षक श्री. सचिन राऊत, श्री. शिवाजी चौरे, सौ. जयश्री माने, मयुरी बिल्लावार, यांनी तर संवेदनाऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील श्री. चन्नया स्वामी, कु. पुजा पाटील, श्रीमती शुभांगी रासुरे, सिद्धांत, श्री मयुर दंडे यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्य़क्ष डॉ. राजेश पाटील, कार्यवाह डॉ. योगेश निटुरकर संवेदना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दीपा पाटील, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री. विठ्ठल गाडेकर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे श्री. व्यंकट लामजणे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.