जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर च्या वतीने जागतिक दिव्यांग सप्ताह निमित्त लातूर येथे दिव्यांग विद्यार्थ्यांचे दोन दिवसीय भौतिक उपचार पद्धती (फिजिओथेरपी) शिबीरास सुरूवात.

लातूर
दि. ०४/१२/२०२४ बुधवार रोजी दिव्यांग सप्ताह निमित्त जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर, समाज कल्याण विभाग , जिल्हा परिषद, लातूर व सुआश्रय निवासी अपंग विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विद्यार्थ्यांचे दोन दिवसीय भौतिक उपचार पद्धती (फिजिओथेरपी) शिबीरास सुआश्रय निवासी अपंग विद्यालय लातूर येथे सुरूवात झाली. या शिबीराचे उद्घाटन मा. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता श्री राजूजी गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात सुआश्रय निवासी अपंग विद्यालय लातूर शाळेतील ४२ दिव्यांग विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आले.
लातूर फिजिओथेरपी काॅलेज चे डाॅ. प्रा. श्रीमती पल्लवी तायडे, श्री डॉ अखिलेश सर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर चे बहुउद्देशीय पुनर्वसन कार्यकर्ता श्री बस्वराज पैके, मुख्याध्यापक, श्री तुकाराम यलमट्टे, विशेष शिक्षक, कर्मचारी, बहुउद्देशीय सामाजिक कार्यकर्ता श्री संतोष कोळगावे, काळजी वाहक व मान्यवर उपस्थित होते.