लातूर येथे दिपावलीच्या दिनानिमित्ताने दिव्यांगजणांना अन्नपूर्णां कीट चे वितरण
लातूर येथे दिपावलीच्या दिनानिमित्ताने दिव्यांगजणांना अन्नपूर्णां कीट चे वितरण
लातूर येथे दिपावलीच्या दिनानिमित्ताने दिव्यांगजणांना अन्नपूर्णां कीट चे वितरण
लातूर
दि. २८/१०/२०२४ रोजी कोरे गार्डन येथे *प्रयास फॉउंडेशन ट्रस्ट मुंबई व जीवनदीप फाउंडेशन लातूर* यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगव्यक्ती व त्यांच्या परिवारासाठी अन्नपूर्णा कीट चे वितरण करण्यात आले. जीवन दीप फाऊंडेशन लातूर यांच्या वतीने शहरात व जिल्ह्यात वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असतात. प्रती वर्षी प्रमाणे या ही दिपावली सणाच्या निमित्ताने दिव्यांग व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांसाठी दिपावली साजरी करण्यात मदत व्हावी म्हणून दिव्यांग (अस्थिव्यंग, श्रवणबाधित, दृष्टी बाधीत, रक्त बाधीत) अश्या दिव्यांगत्वाच्या २१ प्रकारातील दिव्यांग कुटुंबियाना प्रयास फाउंडेशन ट्रस्ट, वाशी मुंबई यांच्या सहकार्याने दीपावली निमित्त मोफत अन्नपूर्णा (किराणा) किट वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ३५० दिव्यांग बांधवांना व त्यांच्या कुटुंबीयांना दिपावली अन्नपूर्णा (किराणा) कीट वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध उद्योगपती श्री सुधीरजी लातुरे होते तर प्रमुख पाहुणे श्री तेजमलजी बोरा, लातूर येथील प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. सोपानजी जटाळ, संवेदना प्रकल्पाचे कार्यवाह डॉ. योगेश निटूरकर, सक्षम जिल्हा सचिव श्री बस्वराज पैके, व श्री निर्मलजी दर्डा यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमचे आयोजक लातूर जीवनदीप फाउंडेशनचे अध्यक्षा श्रीमती संगीता दिलीपचंद चोपडा होत्या. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री राजेशजी डुंगरवाल यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री. दिलीपचंद चोपडा यांनी मानले. यावेळी श्री बजरंगलाल वर्मा, श्री बालाजी कोटलवार हेमंत चोपडा, श्रीमती अरुणा दामा, श्रीमती स्वाती काळे, श्री बालाजी पांढरे, कु रूपाली आदिंसह दिव्यांग बांधव, त्यांचे कुटुंबीय व इत्तर मान्यवर उपस्थित होते.