दि. 10 ऑक्टोबर 2024 रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर कार्यन्वित अभिकर्ता संवेदना प्रकल्पाच्या वतीने संवेदना सेरेब्रल पालसी विकसन केंद्र व संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे श्री.नितीनकुमार आळंदकर समुपदेशक (क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट) यांनी मानसिक आरोग्य दिनाचे महत्त्व सांगितले. श्री आळंदकर यांनी रिलॅक्सेशन थेरपी घेतली व मानसिक आरोग्य चांगले कसे ठेवायाचे या बद्दल मार्गदर्शन केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दीपाताई पाटील, संवेदना औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य सौ. वर्षाताई पाटील व सर्व शिक्षक, काळजीवाहक व दोन्ही प्रकल्पातील विद्यार्थी उपस्थित होते. एकूण 78 जणांनी या समुपदेशन सत्रात सहभाग घेतला.