जागतिक सेरेब्रल पालसी दिनानिमित्त व्यवसाय उपचार पद्धतीचे शिबिर आयोजित करण्यात आले होते
जागतिक सेरेब्रल पालसी दिनानिमित्त व्यवसाय उपचार पद्धतीचे शिबिर आयोजित करण्यात आले होते
जागतिक सेरेब्रल पालसी दिनानिमित्त जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर येथे दि. ०६/१०/२०२४. रविवार रोजी व्यवसाय उपचार पद्धतीचे (Occupational therapy) शिबिर आयोजित करण्यात आले होते. या उपचार पद्धतीचा उपयोग स्वमग्न, सेरेब्रल पाल्सी, बौद्धिक दिव्यांग तसेच बहुदिव्यांग मुलांना होतो . या उपचार पद्धतीचा वेळोवेळी उपयोग करून अशा मुलांमध्ये अमुलाग्र बदल घडून येऊ शकतो. व्यवसाय उपचार तज्ञ (ॲक्युपेशनल थेरपीस्ट) डॉ. निकिता फड यांनी १५ दिव्यांगजणांवर उपचार केले. यावेळी व्यवसाय उपचार पद्धतीचे उपचार घेण्यासाठी आलेल्या तीन दिव्यांग विद्यार्थ्यांना व्हीलचेअर चे वितरण करण्यात आले. संवेदना प्रकल्पाचे कार्यवाह डॉ. योगेशजी निटूरकर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे बहुउद्देशीय पुनर्वसन कार्यकर्ता श्री बसवराज पैके, विशेष शिक्षिका सौ शितल हिप्परगेकर, सौ वैशाली तावरे, संगणक तज्ञ श्री आकाश जोशी, दिव्यांग विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.