दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले
दि.5/10/2024 शनिवार रोजी संवेदना सेरेब्रल पालसी विकसन केंद्र, हरंगूळ (बु) या सि. पी, स्वमग्न, बुद्धीबाधित व बहुविकलांग दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी डॉ.निकिता फड (ऑक्युपेशनल थेरेपीस्ट) यांनी संवेदना शाळेतील पूर्व व्यावसायिक गटातील एकूण आठ मुलांची मागील महिन्यामध्ये तपासणी झालेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांची फेर तपासणी करून आढावा घेतला. या शिबिरासाठी मुलांचे पालकही उपस्थित होते. पालकांनी आपल्या समस्या मांडल्या त्यावर मॅडमनी विविध उपाय, उपक्रम सुचवले व पालकांचे समुपदेशन केले.