लातूर येथे जागतिक मेंदूचा पक्षघात सप्ताह निमित्त "सेरेब्रल पाल्सी" या विषयावर कार्यशाळा संपन्न
लातूर येथे जागतिक मेंदूचा पक्षघात सप्ताह निमित्त "सेरेब्रल पाल्सी" या विषयावर कार्यशाळा संपन्न
लातूर येथे जागतिक मेंदूचा पक्षघात सप्ताह निमित्त "सेरेब्रल पाल्सी" या विषयावर कार्यशाळा संपन्न
दि. ०४/१०/२०२४ रोजी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर कार्यान्वित अभिकर्ता संवेदना प्रकल्प हरंगुळ (बु) लातूर, समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद लातूर, विवेकानंद मेडिकल फाउंडेशन व रिसर्च सेंटर लातूर, व सेवांकुर भारत यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर मधील विवेकानंद रुग्णालयात जागतिक मेंदूचा पक्षघात सप्ताह निमित्त डॉक्टरांसाठी व वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निरंतर वैद्यकीय शिक्षण व्हावे या अनुषंगाने सेरेब्रल पाल्सी विषयावरील कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेत फिटल मेडिसिन तज्ञ डॉ. पद्मावती बियाणी यांनी फिटलं मेडिसिन (अर्भक चिकित्सा) या बाबतीत सविस्तर माहिती दिली. वेळीच आर्भकाची चिकित्सा केल्यानंतर काही जैविक आजारावर नियंत्रण येऊ शकते असे त्यांनी सांगितले. बालरोग तज्ञ डॉ महेश सोनार यांनी मेंदूचा पक्षघाता मध्ये (सेरेब्रल पाल्सी) बाळाच्या हालचालीवर वेळीच लक्ष दिल्यास व वेळीच उपचार केल्यास दिव्यांगत्वाची तिव्रता कमी करता येते असे सांगितले. मेंदूविकार तज्ञ (न्युरोलोजिस्ट) डॉ देवाशिष रूईकर यांनी बाळाची वाढ होत असताना बौद्धिक विकास कसा होतो याबद्दल विस्तृत माहिती दिली. तसेच मेंदूच्या गुंतागुंती बाबत अभ्यासपूर्ण माहिती दिली. भौतिक उपचार पद्धती तज्ञ (फिजिओथेरपीस्ट) डॉ अदिती देवांगरे यांनी मेंदूचा पक्षघात असलेल्या दिव्यांगावर भौतिक उपचार पद्धतीने कशा प्रकारे मदत होऊ शकते याबाबत विस्तृत माहिती दिली. कृत्रिम अवयव रोपण तज्ञ (प्रोस्थोसिस अँड ऑर्थोसिस) डॉ. सरस्वती शहारे यांनी कृत्रिम अवयवा बाबत माहिती देऊन, त्याचा उपयोग केल्यास मेंदूचा पक्षाघात असलेल्या दिव्यांगाला मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते असे सांगितले.
यावेळी संवेदना प्रकल्पाचे संस्थापक अध्यक्ष डॉ मन्मथ भातांब्रे, संस्थापक कार्यवाह श्री सुरेश दादा पाटील, संवेदना प्रकल्पाचे कार्यवाह डॉ योगेश निटूरकर, विवेकानंद मेडिकल फाउंडेशन व रिसर्च सेंटर लातूर चे मा. अध्यक्ष श्री अनिलजी अंधोरिकर, कार्यवाह डॉ राधेश्याम कुलकर्णी, सह कार्यवाह डॉ सि के औरंगाबादकर , प्रशासकीय अधिकारी डॉ गौरी कुलकर्णी, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी डॉ बाजीराव जाधव, बालरोग तज्ञ डॉ तोष्णीवाल, वैद्यकीय अधिकारी डॉ देशमुख, मांजरा आयुर्वेद महाविद्यालयाच्या डॉ नीलिमा नंदनवनकर, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फ़िजिओथेरपी च्या डॉ हर्षा मंत्री व परिसरातील सर्व वैद्यकीय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी तसेच या विषयातील तज्ञ व मान्यवर उपस्थित होते.