राष्ट्रीय सेरेब्रल पाल्सी दिन – 03- ऑक्टोबर- 2024
रा.स्व.संघ, जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत) संचलित, संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्र व श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था लातूर, संचलित – श्री. मारवाडी राजस्थान विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने “राष्ट्रीय सेरेब्रल पाल्सी दिन : ०३ ऑक्टोंबर २०२४” साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख आतिथी म्हणुन सौ. चित्राताई बजाज (अध्यक्षा, शालेय समिती, संवेदना सेरेब्रल पालसी विकसन केंद्र, हरंगुळ बु), सौ. दीपाताई पाटील (मुख्याध्यापिका, संवेदना शाळा),श्री. प्रवीणजी खरोसेकर (मु.अ.राजविद्या), श्री किशोरजी भराडिया (कोषाध्यक्ष,शालेय समिती, संवेदना शाळा), आणि श्री. डॉ. मुदळे प्रशांत (उप मु. अ. राजविद्या) आदि मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
या दिनानिमित्त सेरेब्रल पाल्सी मुलांचे गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. प्रवीण खरोसेकर सर (मु.अ.राजविद्या) यांनी केले. डॉ. पेरीनकावास मुल्लाफिरोज यांनी सेरेब्रल पालसी या क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दलची माहिती सौ. चित्रा बजाज यांनी माहिती दिली. संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्र या शाळेची दैनंदिन दिनचर्या, विद्यार्थी वर्ग व्यवस्था, विद्यार्थ्यांची थेरपी, शाळेमध्ये साजरे केले जाणारे सण-उत्सव इ. विषयी सौ. दीपा पाटील यांनी माहिती दिली. या वेळी प्रत्येक विद्यार्थ्यांने एक दिव्यांग मित्र बनविण्याचा संकल्प करण्यास सांगितला.
संवेदना शाळेतील मुलांनी योग प्रात्यक्षिक व समुह नृत्याचे सादरीकरण केले. श्री मारवाडी राजस्थान विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भारुड, हिंदी नाटिका व समुह नृत्य याचे सादरीकरण केले. दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने सर्व उपस्थितांचे मने जिंकली. श्री. डॉ. प्रशांतजी मुगळे (उप मु.अ. राजविद्या) यांनी उपस्थितांचे आभार मानले व सौ. कुलकर्णी मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. श्री किशोरजी भराडिया (कोषाध्यक्ष,शालेय समिती, संवेदना) यांच्या वतीने संवेदना शाळेतील विद्यार्थांना खाऊ वाटप करण्यात आला. श्री. मारवाडी राजस्थान विद्यालयच्या विद्यार्थ्यांना पाहण्याकरीता दिव्यांगाचा प्रकाराविषयी प्रदर्शनी लावण्यात आली होती.