3 ऑक्टोबर राष्ट्रीय व 6 ऑक्टोबर जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमीत्त दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत रँली संपन्न समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद, लातूर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर, व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा संकुल लातूर येथे सेरेब्रल पाल्सी, बहुविकलांग, दिव्यांग मुलांसोबत चालण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त श्री. अविनाश देवसटवार, जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री. संतोषकुमार नाईकवाडी, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. इंगोले, संवेदना प्रकल्पाचे व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे कार्यवाह श्री. डॉ. योगेश निटुरकर, वैसाका श्री. राजू गायकवाड, सहाय्यक सल्लागार श्री. बाळासाहेब वाकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. अविनाश देवसटवार यांनी सर्व सेरेब्रल पाल्सी दिव्यांगांना शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री. संतोषकुमार नाईकवाडी यांनी सर्व सेरेब्रल पाल्सी दिव्यांग व्यक्तींना शुभेच्छा दिल्या व समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरिता सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. सेरेब्रल पाल्सी या विषयावर श्री. डॉ. योगेश निटुरकर यांनी माहिती दिली. यामध्ये सेरेब्रल पाल्सी म्हणजे मेंदुचा पक्षाघात होय. नवजात अर्भकाचा जन्म होताना मेंदुला ऑक्सीजन कमी पडणे हे त्याचे प्रमुख कारण आहे. याचे त्वरीत निदान होणे महत्वाचे आहे. निदान झाल्यानंतर नियमित फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी बालकांची करुन घेणे हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. शिशु किंवा बाल्याअवस्थेमध्ये अशा थेरपीचा खुप चांगला परिणाम व उपयोग होतो. दुर्देवाने याचे महत्व पालकांच्या लक्षात न आल्यामुळे पाल्याच्या दीर्घकालीन जीवनातील अडथळ्याला सामौरे जावे लागते. व्यसनमुक्ती तथा अमली पदार्थ सेवन विरोधी सप्ताह च्या निमीत्ताने समाजकल्याण विभागातील वैसाका श्री. राजू गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने दिव्यांगांसाठी स्वतंत्र क्रीडांगण उपलब्ध करुन, पँरॉऑलिंपीक ची पुर्वतयारी करुन देण्याचा मानस जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. इंगोले साहेब यांनी व्यक्त केला. मान्यवरांच्या हस्ते रँलीला हिरवा झेंडा दाखवून उदघाटन करण्यात आले. रँलीकरिता लातूर शहर व परिसरातील दिव्यांगांच्या विशेष शाळांमधील दिव्यांग विद्यार्थी, एम आय टी फिजीओथेरपी महाविद्यालयाचे विद्यार्थी, हासेगाव येथील फिजीओथेरपी महाविद्यालयाचे विद्यार्थी, स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ लातूर उपकेंद्र येथील एम एस डब्लु चे विद्यार्थी उपस्थित होते. रँलीच्या आयोजनासाठी सर्व दिव्यांग शाळांमधील मुख्याध्यापक, विशेष शिक्षक, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे बस्वराज पैकै, सौ. शितल हिप्परगेकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. व्यंकट लामजणे यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक सल्लागार बाळासाहेब वाकडे यांनी केले.
22/01/2025