दिव्यांगाचे 21 प्रकार व शासकीय योजनांची माहिती याबाबतची प्रदर्शनी
दिव्यांगाचे 21 प्रकार व शासकीय योजनांची माहिती याबाबतची प्रदर्शनी
दि 30 सप्टेंबर 2024 रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र, पेठ व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगाचे 21 प्रकार व शासकीय योजनांची माहिती याबाबतची प्रदर्शनी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ मराठवाडा उपपरिसर लातूर येथिल सामाजिक संकुलामध्ये घेण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यापीठ संकुलाचे संचालक डॉ. राजेशजी शिंदे यांनी केले. दिव्यांगाच्या 21 प्रकारांची माहिती जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र येथे क्षेत्र कार्यासाठी असलेल्या विद्यार्थ्यांनी या सर्व बाबत सविस्तर माहिती दिली. तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या विशेष शिक्षिका सौ. शीतल हिप्परगेकर यांनी शीघ्र निदान व उपचार याबाबत सविस्तर माहिती दिली. समाजातील व्यंगत्वाबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी समाज कार्याच्या विद्यार्थ्यांनी विशेष प्रयत्न केले पाहिजेत असे संचालक डॉ राजेशजी शिंदे यांनी केले. यावेळी सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ . सागर कोंडेकर, प्रा. कडेकर, प्रा. अनिल जायभाये, प्रा. दत्ता करंडे प्रा. पंचशील डावकर, प्रा. संजय स्वामी, प्रा. विद्या हातोळकर, प्रा. त्र्यंबक गवळे, संगणक विभागाचे प्रमुख श्री विकासजी, तसेचजिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राची व्यवस्थापक श्री बसवराज पैके, संगणक विभागाचे श्री आकाश जोशी हे उपस्थित होते. यावेळी संगणक शास्त्राचे शिक्षण घेत असलेले दिव्यांग श्री ज्ञानेश्वर गाडेकर याचा शाल व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. ही प्रदर्षणी यशस्वी होण्यासाठी श्री संगमेश्वर भुरे, सौ मनीषा भुरे, श्री आनंद मानकोसकर, कु साक्षी भोसले, कु निकिता भोंडे, कु दिपाली लोंढे, श्री पृथ्वीराज क्षीरसागर, श्री आशिष कांबळे, कु संध्या बामणे, कु प्रतिक्षा गवळी, श्रीदेवी बिरादार, श्री निशांत मादळे, श्री विष्णू चव्हाण, श्री करण अडगळे, श्री योगेश डोणेराव यांनी परिश्रम घेतले.सामाजिक शास्त्र, व्यवस्थापन शास्त्र व तंत्रज्ञान शास्त्र संकुलातील ३५० विद्यार्थ्यांनी ही प्रदर्शनी पाहून दिव्यांग विषयाची माहिती घेतली. आतापर्यंत याबाबत आम्हाला माहितीच नव्हती अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उप परिसर लातूर यांना उपयोगात येणारी व्हील चेअर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने पुरवण्यात आली ही व्हीलचेअर संकुलात शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना उपयोगी पडणार आहे.