जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर यांच्या वतीने मुरुड ता. जि. लातूर येथे दिव्यांग विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी संपन्न.

मुरुड
दि. 28 सप्टेंबर 2024 वार शनिवार रोजी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर, चिंतामण परांजपे दृष्टिदान प्रकल्पांतर्गत विवेकानंद वैद्यकीय फाउंडेशन व संशोधन केंद्र लातूर, जिल्हा समाज कल्याण विभाग, लातूर व यशवंतराव चव्हाण सेवाभावी बहुउद्देशीय संस्था संचलित निवासी मूकबधिर व मतिमंद विद्यालय मुरुड यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी व निरामय कार्ड (आरोग्य विमा) नोंदणी शिबिर निवासी मूकबधिर विद्यालय मुरुड येथे संपन्न झाले. या शिबिरात निवासी मूकबधिर विद्यालय व निवासी मतिमंद विद्यालय या दोन शाळेतील एकूण 75 दिव्यांग विद्यार्थी व विशेष शिक्षक यांची तपासणी करण्यात आली. यावेळी मूकबधिर शाळेचे मुख्याध्यापक श्री ओमप्रकाश भिंगे, मतिमंद शाळेचे मुख्याध्यापक श्री सतीश भोसले, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर च्या विशेष शिक्षिका सौ वैष्णवी तावरे, विवेकानंद रुग्णालय नेत्र विभागातील श्री सचिन मानकोस्कर, श्रीमती सुवर्णा शेटे, सौ. गोपिका सौदागर, श्री संतोष खटाळ, श्री राजाभाऊ ठाकूर, दिव्यांग विद्यार्थी, विशेष शिक्षक, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.