जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर येथे श्रवण तपासणी व श्रवण यंत्र वितरण शिबिर संपन्न
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर येथे श्रवण तपासणी व श्रवण यंत्र वितरण शिबिर संपन्न
अली यावर जंग राष्ट्रीय वाक एंव श्रवण दिव्यांगजन संस्थान मुंबई, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर कार्यान्वित अभिकर्ता संवेदना प्रकल्प हरंगुळ ( बु.) व समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने
दि. २४ ते २६ सप्टेंबर २०२४ या काळात तीन दिवसीय श्रवण तपासणी व श्रवण यंत्र वितरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात लातूर जिल्ह्यातील व परिसरातील श्रवणबाधित १७० दिव्यांगजनांनी लाभ घेतला. अली यावर जंग राष्ट्रीय वाक्य एंव श्रवण दिव्यांगजन संस्थान मुंबई चे श्री गोपाल शर्मा जी (विस्तार सेवा सहाय्यक सामाजिक कार्य), श्री संजय खंडागळे (विस्तार सेवा सहाय्यक वाचा व भाषा) श्रीमती चांदसी अनसरे (विस्तार सेवा सहाय्यक वाचा व भाषा), श्री किसन जैस्वाल (ऑडिओलाॅजिस्ट) श्री मसुद हलदर (ऑडिओलाॅजिस्ट) यांनी श्रवणबाधित दिव्यांगजनांनची तपासणी करून ज्या दिव्यांगजणांना श्रवन यंत्राची आवश्यकता आहे त्यांना श्रवण यंत्राचे निःशुल्क वितरण केले. यावेळी श्री. सुरेश दादा पाटील (राष्ट्रीय सल्लागार समिती सदस्य दिव्यांगजन सशक्तिकरण विभाग भारत सरकार), श्री संतोषकुमार नाईकवाडे (जिल्हा समाजकल्याण अधिकारी), डॉ. योगेश निटूरकर (कार्यवाह, संवेदना प्रकल्प), डॉ सचिन जाधव (अधीक्षक, वि. दे. शासकीय रुग्णालय, लातूर), श्री पांडुरंग चापेकर (कोषाध्यक्ष संवेदना प्रकल्प), श्री श्यामजी भराडिया (निधी प्रमुख), श्री. प्रवीण सगर (प्रचार प्रमुख) श्री. सुनील वसमतकर (सदस्य संवेदना प्रकल्प), श्री वैजनाथ व्हनाळे, श्री पारस कोचेटा, सौ. सुमित्रा थोटे (डीडीआरसी, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य), यांनी शिबिरात सहभागी होऊन मार्गदर्शन केले. या शिबिरात एम.एस.डब्लू च्या विद्यार्थ्यांनी सेवाकार्य केले. शिबिर यशस्वी होण्यासाठी डॉ. रतन जाधव (वाचा व भाषा उपचार तज्ञ), श्री. नितीन कुमार आळंदकर (समुपदेशक), डॉ. सरस्वती शहारे (कृत्रिम अवयव तज्ञ), श्री. व्यंकट लांमजने (विशेष शिक्षक), श्री. बस्वराज पैके (व्यवस्थापक), सौ. शितल हिप्परगेकर (शीघ्र निदान व उपचार सहाय्यक), श्री. सचिन राऊत (विशेष शिक्षक), सौ. दिपाली देशमुख (व्यावसाय प्रशिक्षक व संगणक सहाय्यक), सौ. प्रणिता दबडगावकर (विशेष शिक्षिका), सौ. वैष्णवी तावरे (विशेष शिक्षिका), श्री आकाश जोशी (संगणक तज्ञ), श्री. अमोल बंडगर (काळजी वाहक), श्रीमती अन्नपूर्णा बनछरे (काळजी वाहक) यांनी परिश्रम घेतले.