इंग्लंड मधील सेवा यु के या सेवाकार्य करणाऱ्या संस्थेच्या प्रमुखांनी रा.स्व.संघ जनकल्याण समितीच्या संवेदना प्रकल्पास रविवार दि. 29 सप्टेंबर 2024 रोजी भेट दिली. प्रकल्पातील विविध दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शिक्षणाची रचना, फिजीओथेरपी कक्ष, स्पीच थेरपीचे सत्र याचे अवलोकन करण्यात आले. नुकतेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रारंभ केलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील Electrician, Electronic Mechanic, Computer Operator & Prog. Assistant, Dress Making या चार ट्रेड ची तपशीलात माहिती घेतली. या प्रसंगी दिव्यांग विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिक, नाटिका, नृत्य सादर केले. संवेदना प्रकल्पाचे सदस्य, पालक यांच्याशी सेवा यु के च्या विश्वस्तांनी संवाद साधून दिव्यांगांकरिता चाललेल्या विविध उपक्रमांबद्दल समाधान व आनंद व्यक्त केले.