दिव्य कला मेळा पुणे - केंद्रीय मंत्री मा.ना. डॉ. विरेंद्र कुमार जी, मा. मंत्री सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांची घरोंदा प्रकल्पाच्या स्टॉल ला भेट
दिव्य कला मेळा पुणे - केंद्रीय मंत्री मा.ना. डॉ. विरेंद्र कुमार जी, मा. मंत्री सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांची घरोंदा प्रकल्पाच्या स्टॉल ला भेट
दिव्य कला मेळा पुणे - केंद्रीय मंत्री मा.ना. डॉ. विरेंद्र कुमार जी, मा. मंत्री सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांची घरोंदा प्रकल्पाच्या स्टॉल ला भेट ...... सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, भारत सरकार यांच्या वतीने दि. 28 सप्टेंबर 2024 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान “दिव्य कला मेला” या कार्यक्रमाचे आयोजन पीडब्ल्युडी ग्राऊंड, न्यु सांगवी, पिंपरी चिंचवड, पुणे येथे करण्यात आले आहे. 100 पेक्षा अधिक राज्यातील विविध संस्था, दिव्यांग उद्योजक यांनी उत्पादित केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन या ठिकाणी लावण्यात आले आहे. दिव्यांगांकरिता आवश्यक कृत्रिम साहित्य वितरण करण्यासाठी मोजमाप शिबीर या ठिकाणी घेण्यात येत आहे. देशातील विविध राज्यांमधील दिव्यांग कलाकारांच्या केलेचे सादरीकरण येथे होणार आहे. दिव्यांगांसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय न्यास च्या सहयोगाने
रा.स्व.संघ जनकल्याण समिती संवेदना प्रकल्प, हरंगुळ (बु) संचलित, जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र (घरोंदा), नदी हत्तरगा ता.निलंगा जि.लातूर या प्रकल्पास या महत्वाच्या शिबीरामध्ये स्टॉल लावण्याची संधी मिळाली आहे. घरोंदा मधील बौद्धिक दिव्यांग व्यक्तींनी उत्पादित केलेल्या वस्तु व माहितीचा स्टॉल “दिव्य कला मेला” या कार्यक्रमामध्ये लावण्यात आला आहे. या स्टॉलवर घरोंदा प्रकल्पातील विशेष शिक्षक, विद्यार्थी, पालक यांची उपस्थिती आहे.