संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्र हरंगुळ (बु.) येथील पूर्व व्यावसायिक गटातील विद्यार्थी, माध्यमिक 1 आणि प्राथमिक 1 या गटातील काही विद्यार्थी यांना पाच नंबर येथील रिलायन्स स्मार्ट बाजार या ठिकाणी व्हिजिट साठी घेऊन जाण्यात आले होते.

पालकांना याची पुर्व कल्पना दिल्यामुळे पालकांनी मुलांना विविध वस्तू तेथून खरेदी करून आणण्यासाठी सांगितले व त्यांच्यासोबत पैसे पाठवले. मुलांना वस्तू शोधण्यात आनंद आला. वस्तू सापडत नसेल तर कोणाला विचारावे, बिल कुठे करायचे, सामान टाकण्यासाठी ट्रॉलीचा वापर करायचा ,बाहेर पडताना बिल दाखवायचे, वस्तू घेताना वस्तूची किंमत बघायची, अशा बऱ्याच गोष्टी मुलांना शिकायला मिळाल्या तसेच काहीतरी वेगळं केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला. स्मार्ट बाजार येथील मॅनेजर आणि इतर स्टाफ यांनी खूप छान प्रकारे सहकार्य केलं. शाळेची माहिती जाणून घेतली. पुढील आणखी काही ऍक्टिव्हिटी साठी आम्ही तुम्हाला बोलू असे ही सांगितले. मुलांना जाताना भेट म्हणून फ्रुटी दिली. तेथील स्टाफ ने मुलांशी गप्पा मारल्या.
त्यादरम्यान तिथे संगीत शिक्षक श्री. योगेश्वर बुरांडे, योग शिक्षक श्री चेन्नईया स्वामी, विशेष शिक्षिका सौ प्रणिता दबडगावकर (क्षीरसागर) आणि वाहन चालक श्री. लक्ष्मण वाघमारे उपस्थित होते.