संवेदना प्रकल्प येथे गुरुवंदन तथा छात्र अभिनंदन हा उपक्रम घेण्यात आला
संवेदना प्रकल्प येथे गुरुवंदन तथा छात्र अभिनंदन हा उपक्रम घेण्यात आला
भारत विकास परिषद, शाखा लातूर च्या वतीने बुधवार दि. 28 ऑगस्ट 2024 रोजी, संवेदना प्रकल्प येथे गुरुवंदन तथा छात्र अभिनंदन हा उपक्रम घेण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाताई पाटील यांना मानचिन्ह व पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. छात्र अभिनंदन अंतर्गत कु. संचिता रांदड, चि. वेदांत सारंगे, चि. अपूर्व शिंदे, चि. यश सावळकर आणि कु. साक्षी हंचाटे या दिव्यांग विद्यार्थांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी भारत विकास परिषदेचे श्री. जगदीश तोष्णीवाल, श्री. विशाल अयाचित, श्री. सर्वोत्तम कुलकर्णी व श्री. विलासराव आराध्ये सर उपस्थित होते.