'संवेदना' प्रकल्पामध्ये स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला
'संवेदना' प्रकल्पामध्ये स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला
भारताचा स्वातंत्र्य दिन रा. स्व. संघ जनकल्याण समिती संचलित, 'संवेदना' प्रकल्पामध्ये स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. लातूर येथील डॉ. पद्मावती बियाणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर प्रकल्पाचे सदस्य, कर्मचारी यांच्यासमोर फिटल मेडिसीन (Fetal Medicine) या विषयावर व्याख्यान झाले. वैद्यकीय शास्त्रातील नवीन तंत्रज्ञानामुळे फिटल मेडिसीन चा उपयोग केल्याने प्रतिबंधात्मक उपाय अथवा उपचार केल्यामुळे निरोगी नवजात अर्भकाचा,/ शिशुचा सांभाळ चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो. गर्भवती मातेच्या आधुनिक सोनोग्राफीच्या माध्यमातून तपासणी व तत्सम विषयाच्या तपासण्या वेळेपूर्वी करण्याचे महत्त्व त्यांनी विषद केले. याप्रसंगी प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ. राजेश पाटील, उपाध्यक्ष श्री श्रीराम देशपांडे ,कार्यवाह डॉ. योगेश निटूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.