आरोग्य शिबीर दि. 09 ऑगस्ट 2024
संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्र व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र , लातूर यांच्या संयुक्त विद्यामाने शुक्रवार दि. 09 ऑगस्ट 2024, रोजी लातूर जिल्ह्यातील सेरेब्रल पाल्सी प्रवर्गातील मुलांची आरोग्य तपासणी शिबीर डॉ.संदिकर यांच्या हॉस्पिटल मध्ये घेण्यात आले. या साठी ज्युपिटर हॉस्पिटल, मुंबई येथील पेडियाट्रिक ऑर्थोपेडीक तज्ञ व विभाग प्रमुख डॉ. तरल नागदा, डॉ.प्रवीण विश्वकर्मा, पेडियाट्रिक फ़िजिओ थेरापिस्ट - डॉ.अंशी उपाध्याय, डॉ. अमिना मार्कर व ओपीडी सहाय्यक श्री.वीरेंद्र जैन यांनी उपचार करून पालकांना मार्गदर्शन केले.
आरोग्य देवता धन्वंतरी चे पूजन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ.राजेश पाटील, उपाध्यक्ष श्री.ॲड.श्रीरामजी देशपांडे,संपर्क प्रमुख श्री.सुरेश दादा पाटील,समिती सदस्य डॉ.श्रीनिवास संदिकर,समाज कल्याण विभागाचे वै.सा.का.श्री. राजू गायकवाड उपस्थित होते. प्रास्ताविक व परिचय व उद् घाटनाचे सूत्र संचालन डॉ.आरती संदिकर यांनी केले. या शिबिरामध्ये ऐकून 53 दिव्यांग मुलांची तपासणी करण्यात आली. यातील 15 विदयार्थाना शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सुचविले. मुलांचे व्यायामा, औषधे,शिक्षण मुलांच्या वाढी विषयीच्या सर्व शंकांचे निरसन डॉक्टरांनी केले. हे शिबीर परिणामकारक होणयासाठी प्रकल्प समिती सदस्य,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.दीपा ताई पाटील, फ़िजिओ थेरापिस्ट डॉ.मयुरी बिल्लावार, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.