संवेदना शाळेतील बहुविकालंग दिव्यांग मुलांचा आभासी माध्यमातून इंग्लंड मधील मुलांशी संवाद
संवेदना शाळेतील बहुविकालंग दिव्यांग मुलांचा आभासी माध्यमातून इंग्लंड मधील मुलांशी संवाद
संवेदना शाळेतील बहुविकालंग दिव्यांग मुलांचा आभासी माध्यमातून इंग्लंड मधील मुलांशी संवाद ......
दि. ५ जुलै रोजी Sewa UK या अनिवासी भारतीय असलेल्यांची संस्था आहे. अंतरराष्ट्रीय स्तरावर Sewa-UK चे सेवा कार्य चालते. Sewa UK यांनी UK मधील शालीय मुलांमध्ये सेवा भाव निर्माण व्हावा या अनुषंगाने Sewa Bhav in UK (सेवा भाव) अभियान राबविले. त्यांतर्गत Sewa UK चे श्री हरीश भुदिया, सौ अस्मिता भुदिया यांनी लातूरमधील रा स्व संघ जनकल्याण समिती संचलित संवेदना प्रकल्पातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी UK मधील Paston Ridings Primary School व Barnack School मधील विद्यार्थ्यांशी आभासी माध्यमातून संवाद साधला. शाळेतील भौतिक उपचार तज्ञ डॉ मयुरी बिल्लावर यांनी संवेदना व UK मधील मुलांशी समन्यव साधला. विभिन्न ऋतू, सण, संस्कृती, शालीय वातावरण तसेच आवडी निवडी, खेळ, कला विषयक माहितीचे आदान प्रदान झाले. या प्रसंगी संवेदना शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन केले. त्याच प्रमाणे UK मधील शालीय विद्यार्थ्यांनी तयार केलेले शुभेच्छा कार्ड दाखवले. या प्रसंगी UK व संवेदना मधील विद्यार्थ्यांनी स्वागत गीते गाऊन दाखवली. संवेदना मधील बुद्धिबाधित दिव्यांग विद्यार्थिनी कु. श्रीनिधी खडके हिने महाराष्ट्र गीत व UK मधील विद्यार्थ्यांनी प्रार्थना गीत व पारंपारिक गीत गायले. संवेदना शाळेच्या वतीने भौतिकउपचार तज्ञ डॉ. मयुरी बिल्लावर तसेच UK मधील शाळेच्या वतीने श्रीमती जेमी विलकॉक्स व श्रीमती लिझ या शिक्षकांनी समन्वय साधला.