संवेदना प्रकल्प, हरंगुळ (बु) लातूर च्या वतीने हेलन केलर यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी केली.
संवेदना प्रकल्प, हरंगुळ (बु) लातूर च्या वतीने हेलन केलर यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी केली.
संवेदना प्रकल्प, हरंगुळ (बु) लातूर च्या वतीने हेलन केलर यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी केली.
1) जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर च्या वतीने हेलन केलर जयंती निमित्त चाकूर येथे दिव्यांग विद्यार्थ्यांची नेत्र
तपासणी संपन्न.
दि. २७/०६/२०२४ रोजी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर, विवेकानंद वैद्यकीय फौंडेशन व संशोधन केंद्र, लातूर, जिल्हा समाज कल्याण विभाग, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने हेलन केलर यांच्या 144 व्या जयंतीनिमित्त चाकूर तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी शिबिर निवासी मतीमंद विद्यालय चाकूर येथे संपन्न झाले
आज दि.27/6/2024 गुरुवार रोजी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर या ठिकाणी हेलन केलर यांची जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विशेष शिक्षिका श्रीमती शितल हिप्परगेकर यांनी त्यांच्या कार्याची माहिती दिली. यावेळी हासेगाव येथील फिजिओथेरपी कॉलेजच्या प्राध्यापिका डॉ शारदा मॅडम व त्यांचे विद्यार्थी, संगणक तज्ञ आकाश जोशी, विकास कांबळे व श्रीमती अन्नपूर्णा बनछेरे, दिव्यांग विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.
2) आज दि. 27 जून 2024 रोजी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, मुंबई उपनगर यांच्या वतीने हेलन केलर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्राच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. विवेक आचार्य यांनी हेलन केलर यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू व त्यांच्या संघर्षपूर्ण जीवनातील महत्वपूर्ण घटना उपस्थिंतांसमोर मांडून त्यापासून आपण कशी प्रेरणा घेऊ शकतो व स्वतःच्या तसेच समाजाच्या प्रगतीस कसा हातभार लावू शकतो हे नमूद केले.
3) दिनांक 27-6-2024 रोजी जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र, नदीहत्तरगा. घरोंदा या प्रकल्पात हेलन केलर यांची जयंती विद्यार्थी व कर्मचारी यांनी मिळून साजरी केली. तसेच विशेष शिक्षक शिवशंकर सुरवसे यांनी मुलांना माहिती दिली.
4) आज दिनांक 27 जून 2024 रोजी संवेदना प्रकल्पामध्ये हेलन केलर यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी त्यांच्या जीवना विषयी माहिती शाळेतील फिजिओथेरपिस्ट सौ.मयुरी बिलावर मॅडम यांनी दिली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दीपाताई पाटील, शिक्षक, काळजीवाहक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.