जागतिक हेमोफिलिया दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम संपन्न लातूर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय लातूर, समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद लातूर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर व महाराष्ट्र इन्स्टीट्यूट ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हेमोफिलिया दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे व भौतिक उपचार पद्धती (फिजिओथेरपी) शिबिराचे आयोजन जिल्हा शीघ्र निदान व उपचार केंद्र लातूर येथे करण्यात आले होते. यावेळी १० हिमोफिलिया रुग्णांवर डॉ. सचिन कोकणे, डॉ. प्रज्ञा टेले, कु. अमृता गपाट, कु. पद्मजा चाटे यांनी भौतिक उपचार पद्धती ने उपचार केले, तसेच रूग्णाच्या गरजेनुसार त्यांना फॅक्टर (आवश्यक औषधी उपचार) देण्यात आले. या वेळी जिल्हा शैल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालय लातूर चे प्राचार्य डॉ सुभाष खत्री, जिल्हा स्त्री रुग्णालय लातूर चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रविंद्र भालेराव, समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद लातूर चे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता श्री डॉ राजू गायकवाड, संवेदना प्रकल्पाचे कार्यवाह डॉ. योगेश निटूरकर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे स्थानिक समिती सदस्य श्री पारस कोटेचा, श्री सुरज बाजूळगे, बहुउद्देशीय पुनर्वसन कार्यकर्ता श्री बस्वराज पैके, विशेष शिक्षिका सौ. जयश्री माने, सौ शितल हिप्परगेकर, संगणक तज्ञ श्री अनुप दबडगावकर, जिल्हा बालविकास व उपचार केंद्राचे डॉ. अशोक धुमाळ, नदाफ अलीम , प्रताप देशमुख, श्रीकांत रोहनकर, चंद्रकांत केंद्रे,किरण कणकुटे, कर्मचारी, हिमोफिलिया रुग्ण व त्यांचे पालक उपस्थित होते. हेमोफिलिया रुग्णाची वाढती संख्या ही एक चिंतेची बाब आहे. हिमोफिलिया ग्रस्त दिव्यांगांना नियमीत ब्लड क्लॉटिंग फॅक्टर व फिजिओथेरपी ची आवश्यकता लागते, तसेच लातूर मध्ये स्त्री रुग्णालयात हिमोफिलिया डे केयर सेंटर सुरू झाल्यामुळे हिमोफिलिया ग्रस्त दिव्यांगना आता फॅक्टर साठी छत्रपती संभाजीनगर, पुणे किंवा मुंबई येथे जाण्याची गरज नाही. त्यामुळे अस्थिव्यंग किंवा जीवतहानी टाळता येऊ शकते. RPD Act 2016 नुसार हिमोफिलिया चा 21 प्रकारच्या दिव्यांगत्वा मध्ये समावेश करण्यात आला आहे असे डॉ योगेश निटूरकर यांनी आपल्या प्रस्ताविकेत मत व्यक्त केले. सकारात्मक विचार केल्यास कुठल्याही आजारावर मात करता येते. हिमोफिलिया यामध्ये येणारे आस्थेव्यंग टाळण्यासाठी नियमीत भौतिक उपचार महत्वाचे आहे असे डॉ सुभाष खत्री यांनी आपले मनोगत व्यक्त केले. लातूर मध्ये हिमोफिलिया डे केयर सेंटर सुरू झाल्याने हिमोफिलिया ग्रस्त दिव्यांगांना फायदा होत आहे असे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूरच्या स्थानिक व्यवस्थापन समिती चे सदस्य श्री पारस कोचेटा यांनी सांगितले. समाजकल्याण विभागाचे श्री राजू गायकवाड यांनी हिमोफिलिया जनजागृती व उपचारासाठी समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद लातूर व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत सहकार्य करू असे मनोगत व्यक्त केले. हिमोफिलिया डे केयर सेंटर मध्ये कुठले फॅक्टर्स उपलब्ध आहेत याची माहिती हिमोफिलिया ग्रस्त दिव्यांगांना देण्यात यावी असे स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ रवींद्र भालेराव यांनी सुचवले. अध्यक्षीय समारोपमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी हिमोफिलिया बाबत जनजागृती, वेळीच उपचार करण्यासाठी प्रशासन नेहमी प्रयत्नशील आहे त्याचाच एक भाग म्हणून प्रशासनाने महाराष्ट्रात 27 ठिकाणी हिमोफिलिया डे केयर सेंटर सुरू केले. फॅक्टर्सचा तुटवडा असल्याने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फॅक्टर्स उपलब्ध करण्यात आली आहेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री आत्माराम पळसे, आनंद कुसभागे, श्रीमती अनुराधा अर्जुने यांनी परिश्रम घेतले.
31/12/2024