दि. 21 मार्च 2024 रोजी जागतिक डाऊन सिंड्रोम डे च्या निमित्ताने डाऊन सिंड्रोम असलेल्या दिव्यांग जणांच्या चित्र रंगविण्याची स्पर्धा घेण्यात आली.
दि. 21 मार्च 2024 रोजी जागतिक डाऊन सिंड्रोम डे च्या निमित्ताने डाऊन सिंड्रोम असलेल्या दिव्यांग जणांच्या चित्र रंगविण्याची स्पर्धा घेण्यात आली.
दि. 21 मार्च 2024 रोजी जागतिक डाऊन सिंड्रोम डे च्या निमित्ताने जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर कार्यन्वित अभिकर्ता संवेदना प्रकल्प हरंगूळ (बु), लातूर येथे डाऊन सिंड्रोम असलेल्या दिव्यांग जणांच्या चित्र रंगविण्याची स्पर्धा घेण्यात आली. तसेच त्यांच्या पालकांना भौतिक उपचार पद्धती ने आशा मुलांना लाभ कसा होतो याचे महत्व लातूर फिजिओथेरपी कॉलेज च्या प्राध्यापिका डॉ. पल्लवी तायडे यांनी सांगितले. यावेळी सर्वांनी पिवळ्या व निळ्या रंगाचा पोशाख परिधान करून डाऊन सिंड्रोम दिव्यांगजनांना समर्थन दिले. यावेळी लातूर फिजिओथेरपी कॉलेज च्या प्राध्यापिका डॉ. पल्लवी तायडे व त्यांची टीम जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रचे विशेष शिक्षिका सौ शितल सूर्यवंशी (हिप्परगेकर), मानसोपचार तज्ञ श्री नवाज शेख, संतबापुदेव साधू निवासी मतिमंद विद्यालयातील विशेष शिक्षक श्री शेख एम. एच., काळजीवाहक मोरे बी.बी व पालक उपस्थित होते. यावेळी डाऊन सिंड्रोम मुलांना भेट म्हणून शैक्षणिक दप्तर व साहित्य देण्यात आले.