जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर च्या वतीने अहमदपूर येथे दिव्यांग विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी संपन्न.
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर च्या वतीने अहमदपूर येथे दिव्यांग विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी संपन्न.
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर च्या वतीने अहमदपूर येथे दिव्यांग विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी संपन्न.*
अहमदपूर
दि. १६/०३/२०२४ रोजी चिंतामण परांजपे दृष्टीदान प्रकल्पांतर्गत विवेकानंद रुग्णालय, समाज कल्याण विभाग, लातूर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर कार्यन्वित अभिकर्ता संवेदना प्रकल्प, हरंगूळ (बु) व ग्रामीण रुग्णालय, अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी शिबिर उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे संपन्न झाले. या शिबिरात २१० दिव्यांग विद्यार्थी , काळजीवाहक यांची नेत्र व आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी, ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवाजी किशनराव सुरजमल, श्री गणेश सुर्यवंशी, डॉ . अमृत चिंचवडे, श्री निलेश रेड्डी, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर चे बहुउद्देशीय पुनर्वसन कार्यकर्ता श्री बस्वराज पैके, मानसोपचार तज्ञ श्री. नवाज शेख, श्री दत्तु बिरादार, श्री इंद्राळे, श्री गुनराज मंडाले, विवेकानंद रुग्णालयाचे श्री. सचिन मानकोसकर, श्रीमती सुवर्णा शेटे, श्री श्रीकांत तुरटवाड, श्री संतोष खटाळ, श्री प्रशांत भोसले, श्री आत्माराम पळसे, दिव्यांग विद्यार्थी, मुख्याध्यापक, विशेष शिक्षक, काळजी वाहक, पालक व मान्यवर उपस्थित होते. या तपासणी शिबिरामध्ये एकूण ५ दिव्यांग शाळेच्या विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.