जागतिक श्रवण दिन असल्याने जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर च्या वतीने जिल्ह्यातील श्रवण बाधित दिव्यांग विद्यार्थ्यांना श्रवण यंत्र देण्यात आले
जागतिक श्रवण दिन असल्याने जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर च्या वतीने जिल्ह्यातील श्रवण बाधित दिव्यांग विद्यार्थ्यांना श्रवण यंत्र देण्यात आले
दि. ०४/०३/२०२४ रोजी 3 मार्च हा जागतिक श्रवण दिन असल्याने जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर च्या वतीने जिल्ह्यातील श्रवण बाधित दिव्यांग विद्यार्थ्यांना श्रवण यंत्र देण्यात आले. यावेळी श्रवण व वाचा उपचार तज्ञ डॉ. रतन जाधव, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर चे स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य इंजि. वैजनाथ व्हणाळे, बहुउद्देशीय पुनर्वसन कार्यकर्ता श्री बस्वराज पैके, मानसोपचार तज्ज्ञ श्री नवाज शेख, विशेष शिक्षिका श्रीमती शितल सुर्यवंशी (हिप्परगेकर) , श्रीमती अन्नपूर्णा बनछरे, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.श्रवण यंत्राचे लाभ घेतलेले सेवीतजण खालील प्रमाणे आहेत.
१. कु. सृष्टी ओमप्रकाश गजीले
२. कु. दिपा दत्ता सुरवसे
३. कु. यशोधरा दत्ता सुरवसे
४. कु. रेश्मा चंदू जाधव
५. चि. आरूष महादेव मोरे
६. चि. प्रविण परमेश्वर घोडके
७. चि. रमण गोविंद एल्गाट्टे
८. चि. कार्तिक ओमप्रकाश गजीले
९. चि आर्षद खय्युम शेख