यज्ञ म्हणजे संस्कृतीचे संवर्धन, पर्यावरणाची शुद्धीकरण, विश्वाच्या कल्याणासाठी केलेली ईश्वराची सर्वोच्च उपासना.

महर्षी याज्ञवलकर संस्कृत वेद विद्या प्रतिष्ठान गंगाखेड द्वारा आयोजित तथा बहुसोमयाजी *प.पु.यज्ञ मार्तंड यज्ञेश्वर रंगनाथ सेलुकर महाराज* यांच्या करकमलाद्वारे श्रीराम लल्लाच्या स्पर्शाने पावन झालेल्या शरयुतीरी वसलेल्या श्री क्षेत्र अयोध्या नगरीत राष्ट्रहितार्थ "राष्ट्र काम सप्तदशरात्र महासोमयागाचे"
आयोजन करण्यात आले आहे. या सर्वोच्च इश उपासनेत फूल नाही फुलाची पाकळी या उक्तीप्रमाणे *संवेदना प्रकल्प हरंगुळ अंतर्गत जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र (घरोंदा )नदी हत्तरगा*, येथील केंद्रामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यां मार्फत तयार करण्यात आलेले, गाईच्या शेणाचे गोळे (कंडे)
श्रीक्षेत्र आयोध्या येथे ११ मार्च ते ९ एप्रिल या कालावधीत होत असलेल्या महासोमयागासाठी पाठवण्यात आले.
यामध्ये प्रकल्पातील कु. हिराबाई गवळी, कु. पूजा पाटील , कु . रमा ढगे, वरद कुलकर्णी, दिनेश माने, समर्थ कुलकर्णी, लक्ष्मीकांत कोल्हे, अक्षय दांडगे, समर्थ खेमे, संकेत गिरी या विद्यार्थ्यांनी रोज नित्य नियमाने बनवलेले शेणाचे गोळे अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात अयोध्या येथील यज्ञासाठी पाठवण्यासाठी आपले अमूल्य असे योगदान दिले आहे.
यावेळी प्रकल्पामधील सर्व विशेष शिक्षक आणि काळजीवाहक उपस्थित होते.