लातूर जिल्ह्यातील हेमोफिलिया रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा लातूर जिल्हा रुग्णालयात मिळणार.
लातूर जिल्ह्यातील हेमोफिलिया रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा लातूर जिल्हा रुग्णालयात मिळणार.
लातूर जिल्ह्यातील हेमोफिलिया रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा लातूर जिल्हा रुग्णालयात मिळणार.
आज दिनांक २७/०२/२०२४ रोजी लातूर जिल्हा रुग्णालयात हेमोफिलिया डे केअर सेंटर ला भेट देऊन. येथे रोज सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत हेमोफिलिया रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा देण्यात येते. दि. २६/०२/२०२४ पासुन हेमोफिलिया रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या मुळे हेमोफिलिया रुग्णांना उपचारासाठी पुणे मुंबई येथे जाण्याची आवश्यकता नाही. यावेळी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर व हेमोफिलिया ग्रस्त रूग्णांच्या वतीने सेवा देणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. व सर्वांचे आभार मानले. जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ रविंद्र भालेराव यांनी हेमोफिलिया रुग्णांना कोणताही त्रास होणार नाही याची हमी दिली. तसेच दर आठवड्याला शिल्लक फाॅक्टरच्या साठ्या बाबत हेमोफिलिया रुग्णांना कळविण्यात येईल असे सांगितले. यावेळी जिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ रविंद्र भालेराव , वैद्यकीय अधिकारी डॉ मुद्धसर सत्तारी, औषधं निर्माता श्री तांबोळी, मुख्य परिचारिका श्रीमती मनिषा साखरे, परिचारिका श्रीमती पल्लवी चव्हाण, श्री दिपा कांदे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर स्थानिक समिती सदस्य श्री पारस कोटेचा, बहुउद्देशीय पुनर्वसन कार्यकर्ता श्री बस्वराज पैके, संगणक तज्ञ श्री अनुप दबडगावकर, श्री त्र्यंबक स्वामी, श्री अनुप धूत, हेमोफिलिया चे रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.