दि 16/2/24 शुक्रवार रोजी रा. स्व. संघ जनकल्याण समिती, महाराष्ट्र प्रांताचा 51 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
दि 16/2/24 शुक्रवार रोजी रा. स्व. संघ जनकल्याण समिती, महाराष्ट्र प्रांताचा 51 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
दि 16/2/24 शुक्रवार रोजी रा. स्व. संघ जनकल्याण समिती, महाराष्ट्र प्रांताचा 51 वा वर्धापन दिन जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर येथे साजरा करण्यात आला. या प्रसंगी संवेदना प्रकल्पाचे निधीप्रमुख श्री श्यामकुमार भराडिया यांनी प्रास्ताविक केले, कार्यवाह डॉ. योगेश निटूरकर यांनी संवेदना प्रकल्पाची माहिती सांगितली तसेच रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे मा. उपाध्यक्ष प्रा. डॉ. श्री रमेश जोशी यांनी रा. स्व. संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांताच्या मोठ्या आठ प्रकल्पाची माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पांडुरंग जी चाफेकर यांनी केले व आभार प्रदर्शन ॲड. श्रीरामजी देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता कल्याण मंत्रानी झाली. या वेळी संवेदना प्रकल्पाचे हितचिंतक, देणगीदार, प्रकल्प समिती सदस्य, शाळेतील विशेष शिक्षक, थेरपिस्ट, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दि. 15 ते 29 फेब्रुवारी 24 रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे पर्यंत निधी संकलन पंधरवडा आहे त्यानुषंगाने सौ. वंदना श्यामकुमार भराडीया यांनी देणगी म्हणून रु 11000/- चा धनादेश मा. प्रांत उपाध्यक्ष प्रा. डॉ. रमेशजी जोशी यांना दिला.