भारतीय नाट्य परिषद मुंबई आयोजित विभागीय १०० वे मराठी नाट्य संमेलन लातूर मध्ये संपन्न झाले
भारतीय नाट्य परिषद मुंबई आयोजित विभागीय १०० वे मराठी नाट्य संमेलन लातूर मध्ये संपन्न झाले
भारतीय नाट्य परिषद मुंबई आयोजित विभागीय १०० वे मराठी नाट्य संमेलन लातूर मध्ये संपन्न झाले. त्यानुषंगाने बाल नाट्य महोत्सामध्ये संवेदना सेरेब्रल पाल्सी, हरंगुळ (बु) च्या बुद्धी बाधित व बहुविकलांग दिव्यांग विद्यार्थ्यांनी 'शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ' ही नाटिका सादर केली. या नाटकीमध्ये 1) चि.ओम फड, 2) चि.अपूर्व शिंदे, 3)चि.प्रीतम पन्हाळे, 4) चि.श्रीनिवास नलाबले, 5) कु.विनया जोशी, 6) कु.मानवी पाटील, 7)चि.सृजन उकिरडे, 8)चि.फैज पठाण, 9) पार्थ चाफ़े या कलाकारांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील निवड फेरीमध्ये शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ (रोख ₹ 2500) पारितोषिक प्राप्त केले.
या नाटिकेचे दिग्दर्शन शाळेतील विशेष शिक्षिका सौ.जयश्री माने यांनी केले व संगीत शिक्षक श्री योगेश्वर बुरांडे यांनी साह्ययक म्हणून काम पाहिले.