हैदराबाद येथे झालेल्या सांस्कृतिक स्पर्धेत जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्रास द्वितीय पारितोषिक
हैदराबाद येथे झालेल्या सांस्कृतिक स्पर्धेत जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्रास द्वितीय पारितोषिक
हैदराबाद येथे झालेल्या सांस्कृतिक स्पर्धेत जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्रास द्वितीय पारितोषिक
दि. 8 व 9 फेब्रुवारी 2024 रोजी राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांग सशक्तिकरण संस्था,( दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग ,सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार) यांनी विशेष कर्मचारी यांची 29 वी राष्ट्रीय परिषद सिकंदराबाद, तेलंगना येथे आयोजित केलेली होती. या परिषदेमध्ये संवेदना प्रकल्पाने भाग घेतला होता.प्रकल्पाच्या जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र .(घरोंदा )केंद्रातील दिव्यांग व्यक्तींच्या सांस्कृतिक कार्यक्रमातील "माऊली" गाण्यावरील नृत्यास दुसरे पारितोषिक मिळाले. या प्रसंगी चि. वरद (ऑटीस्टिक) या विद्यार्थ्याचे वैयक्तिक गीत उत्कृष्ट झाले. या परिषदेमध्ये देशभरातील 50 पेक्षा अधिक संस्था सहभागी झाल्या होत्या. बौद्धिक दृष्ट्या दिव्यांगजनांनी तयार केलेले विविध वस्तूंचे स्टॉल/ प्रदर्शनी या ठिकाणी लावण्यात आले होते. संवेदना प्रकल्पाचे दोन स्टॉल होते. शेती व गो पालन आधारित एक स्टॉल व विविध प्रकारच्या माळा व शोभेच्या वस्तूंचे दुसरे स्टॉल होते. गायीच्या शेणापासून तयार केलेल्या गोवऱ्या अग्निहोत्रासाठी विक्री करण्यात येते. गोवऱ्या ची निर्मिती घरोंदा केंद्रात होत असल्याची माहिती व त्यातील पर्यावरणाचे महत्व विशेष शिक्षकांनी उपस्थितांना करून दिले. केंद्रातील उत्पादित लिंबू सरबत विक्रीस होते. त्याचा आस्वाद मान्यवर आणि उपस्थित पालक, विशेष शिक्षकांनी घेतला. लातूरच्या सर्व टीमचे कौतुक संचालक श्री. राम कुमारजी व डॉ. चेतन कुमारजी यांनी केले. या परिषदेसाठी श्री. बस्वराज पैके. सौ. दिपाली देशमुख, सौ अनामिका कुलकर्णी,श्री. शिवशंकर सुरवसे, श्री. भीम विभुते, सौ. संगीता खेमे यांनी परिश्रम घेतले.